'ज्ञानव्यापी ही कयामतपर्यंत मशिदच राहणार...' शिवलिंग सापडल्याच्या चर्चेनंतर ओवसींचा दावा

Asaduddin owaisi | Gyanvapi mosques| ज्ञानव्यापी मशिदीच्या वास्तूमध्ये शिवलिंग सापडल्याची माहिती समोर आली आहे.
Asaduddin owaisi | Gyanvapi  mosques
Asaduddin owaisi | Gyanvapi mosquesSarkarnama

Asaduddin owaisi latest News

नवी दिल्ली : ज्ञानव्यापी मशिदीच्या वास्तूमध्ये शिवलिंग सापडल्यानंतर स्थानिक प्रशासनाने ती जागा तातडीने सील करावी आणि त्या ठिकाणी कुणालाही प्रवेश देऊ नये, असे निर्देश दिले आहेत. न्यायालयाने पोलीस आयुक्त (Police) आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) प्रमुखांना हा परिसर तातडीनं सील करण्यास सांगितले आहे . या जागेचे संरक्षण करण्याची जबाबदारी या अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे.

आवारामध्ये शिवलिंग सापडल्याच्या हिंदू पक्षाच्या दाव्यावर एमआयएम’ पक्षाचे प्रमुख असादुद्दीन ओवेसी यांनी या प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. याच वेळी त्यांनी आपल्या ट्विटमध्येही गुजरातमधील एका सभेचा व्हिडीओ टॅग केला.

Asaduddin owaisi | Gyanvapi  mosques
काशीतील ज्ञानवापी मशिदीत सापडलं शिवलिंग; जागा तातडीनं सील

“आता आम्ही कोणतीही मशीद गमावणार नाही, ज्ञानव्यापी मशिद ही कयामतपर्यंत मशिदच राहणार, असा दावा ओवेसी यांनी केला आहे. ''मी २०-२१ वर्षांचा असताना बाबरी मशीद माझ्याकडून हिसकावून घेण्यात आली. आता आम्ही १९-२० वर्षांच्या मुलांच्या डोळ्यासमोर पुन्हा एकदा मशीद गमावणार नाही. इंशा अल्लाह आता आम्ही आमची मशीद गमावणार नाही. आम्हाला तुमचे हेतू माहित झालेत,” असंही औवेसींनी म्हटलं आहे.

“ज्ञानव्यापी मशीद ही मशीद होती आणि जोपर्यंत अल्लाह जगात कायम आहे तोपर्यंत ही मशीदच राहणार,” असंहही त्यांनी प्रशासनाला ठणकावून सांगितलं आहे. “आपण आपल्या गावातील आणि शहरांमधील मशिदींना सुरक्षित ठेवलं तर भारताचा मुस्लीम आता मशीद गमावण्याच्या तयारीत नाही, असा संदेशच यांना जाईल, असंही त्यांनी म्हटलं आहे.

Asaduddin owaisi | Gyanvapi  mosques
मद्यराष्ट्र म्हणणाऱ्यांना चपराक; महाराष्ट्रापेक्षा भाजपशासित राज्यचं मद्यसेवनात आघाडीवर

ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणामुळे आपल्याला धक्का बसला आहे. पण १९९१ च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे कानाडोळा करणारं हे सर्वेक्षण आहे, आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना घाबरत नाही, म्हणूनच आपण या प्रकरणालक बोलतच राहणार असल्याचं ओवैसींनी यांनी स्पष्ट केलं आहे.

ज्ञानवापी मशिदीच्या मुद्द्यावर लोक मला प्रश्न विचारत असतात. पण मी बोलणार कारण मी माझा अंतरात्मा विकला नाही आणि विकरणारही नाही. मी बोलतो कारण मी फक्त अल्लाहला घाबरतो, कोणत्या मोदी किंवा योगीला नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या संविधानाने मला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे, म्हणून मी बोलतो, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान,मशिदीच्या वास्तूमध्ये शिवलिंग सापडल्याचा दावा हिंदू पक्षकारांनी केला असून, मुस्लिम पक्षकारांनी याचं खंडन केलं आहे. न्यायालयामध्ये उद्या (ता.१७) हा अहवाल सादर करण्यात येईल. हिंदू पक्षकारांपैकी एक असलेले डॉ. सोहनलाल यांनी मशिदीच्या परिसरात खोदकाम करताना अपेक्षेपेक्षाही बरेच काही हाती लागल्याचे म्हटले आहे. मशिदीच्या पश्चिमेकडील प्रवेशद्वाराजवळ ७५ फूट लांब, ३० फूट रुंद आणि १५ फूट उंच ढिगारा असून, त्याच्या सर्वेक्षणाची मागणीही न्यायालयात करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

मशिदीतील सर्वेक्षणाबाबत अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेवर आज (ता.१७) सुनावणी होणार आहे. न्या. डी.वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर या प्रकरणी सुनावणी होईल. सत्र न्यायालयाने नेमलेल्या समितीच्या माध्यमातून ज्ञानवापीच्या परिसरामध्ये सर्वेक्षण केले जावे, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला होता. अंजुमन इंतेजामिया मशीद समितीकडून याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in