POK ताब्यात घेणारच, गिलगिट-बाल्टिस्तानशिवाय काश्मीर अपूर्ण : राजनाथ सिंह कडाडले!

Rajnath Singh : दहशतवादाला कोणताही धर्म नसतो. पाकिस्तान हे दहशतवाद्यांचे आश्रयस्थान आहे.
Rajnath Singh
Rajnath Singh Sarkarnama

दिल्ली : देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकीस्तान व्याप्त काश्मीरबाबत (PoK) पाकिस्तानला इशारा दिला. पाकव्याप्त काश्मीरमधील जनतेवर पाकिस्तान अत्याचार करत असून त्याचे परिणाम पाकीस्तानला भोगावे लागतील, असे ते गुरुवारी म्हणाले. गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये पोहोचल्यानंतरच जम्मू-काश्मीर आणि लडाखचा विकास होईल, असे त्यांनी म्हंटले.

शौर्य दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात सिंह सहभागी झाले होते. यावेळी उपस्थित समुदायाला संबोधित करताना सिंह म्हणाले, "आम्ही नुकतंच जम्मू-काश्मीर आणि लडाखच्या विकासाची वाटचाल सुरू केली आहे. जेव्हा आपण गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये पोहोचू तेव्हाच आपले ध्येय पूर्ण होईल. 1947 मध्ये आजच्या दिवशी भारतीय वायुसेनेने श्रीनगरमध्ये लँडिंग केले होते. हा दिवस शौर्य दिवस म्हणून साजरा केला जातो."

Rajnath Singh
Mallikarjun Kharge : काँग्रेसच्या नव्या स्टेअरिंग कमिटीची घोषणा, थरूरांना डावलेले : खर्गे अॅक्शन माेडमध्ये!

अतिरेकी हल्ला :

पाकिस्तान सर्वसामान्य लोकांवर जे काही अत्याचार करत आहे, त्याचे परिणामही जगासमोर येईल. दहशतवादाला कोणताही धर्म नसतो. पाकिस्तान हे दहशतवाद्यांचे आश्रयस्थान आहे आणि ते भारताविरुद्ध दहशतवाद्यांचा वापर करत आहे, असेही सिंह म्हणाले. यावेळी त्यांनी आवर्जून ३७० कलमचा उल्लेख केला. "केंद्र सरकारने 5 ऑगस्ट 2019 रोजी कलम 370 हटवण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे जम्मू-काश्मीरमधील लोकांसोबत होणारा भेदभाव आता संपुष्टात आले आहे, असेही सिंह म्हणाले.

Rajnath Singh
काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारताच खर्गेंनी मोदी-शहांच्या गुजरातमध्ये लक्ष घातले : १२५ उमेदवार केले निश्चित

भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीबद्दल बोलताना संरक्षण मंत्री म्हणाले की, फाळणीची कथा 1947 मध्ये लिहिली गेली होती. आता त्या आठवणींची रक्ताची शाई कोरडी झाली होती, तेव्हाच पाकिस्तानने दगाबाजी सुरू केली. या दरम्यान पाकिस्तानने दाखवलेले आपले चरित्र्याची कल्पनाही करवत नाही. पाकिस्तानने काश्मीरमध्ये जे रक्त सांडले त्यामागे त्यांना भारतालाच लक्ष्य करायचे आहे, असे ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in