महाराष्ट्राने समिती स्थापन करताच कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणाले, आम्हीही तयार...भाजप आमने-सामने

Maharashtra-Karnataka Border News : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाच्या प्रश्नावर भाजप विरुद्ध भाजप...
Maharashtra-Karnataka CM
Maharashtra-Karnataka CM Sarkarnama

Maharashtra-Karnataka Border News : गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र-कर्नाटकच्या सीमाप्रश्नाचा वाद सुरू आहे. या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी आता दोन्ही राज्य कायदेशीर लढाईला सामोरे जाणार आहेत. महाराष्ट्र सरकारने या प्रश्नावर कायदेशीर लढाईत समन्वय साधत मार्ग काढण्यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांची नियुक्ती केली आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाच्या प्रश्नावर कायदेशीर लढाईसाठी वरिष्ठ वकिलांसोबत कॉन्फरन्सही आयोजित केली आहे. मात्र या सीमावादाच्या प्रश्नाच्या पार्श्वभूमीवर भाजप आमने-सामने येण्याची शक्यता आहे. कारण कर्नाटकमध्ये सध्या भाजपचं सरकार आहे, तर महाराष्ट्रातदेखील भाजप (BJP) सत्तेत आहे. त्यामुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा प्रश्न सोडवताना भाजप विरुद्ध भाजप असं होण्याची शक्यता आहे.

Maharashtra-Karnataka CM
Congress : राज्यपालांना हटवा, आफताबला फाशी द्या ; काॅंग्रेसची मागणी..

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाच्या वादावर कर्नाटक सरकार कायदेशीर लढाई लढण्यास तयार असल्याचं म्हटलं आहे. तर इकडे याच प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राज्यातील 14 सर्व पक्षीय नेत्यांची बेठक घेतलीय. त्यानंतर या प्रश्नावर न्यायालयात बाजू मांडण्यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Maharashtra-Karnataka CM
चोरट्यांना घरात काहीच मिळाले नाही, म्हणून चोरली कार; पण...

दरम्यान, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाच्या प्रश्नावर दोन्ही राज्यांकडून आपआपल्या स्तरावर बैठका सुरु करण्यात आल्या आहेत. तर याविषयावर बोलताना कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी महाराष्ट्रातील राजकीय पक्ष सीमावादाचे राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे सीमावादाच्या प्रश्नावरून पुन्हा एकदा राजकारण तापण्याची चिन्हं आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com