मोठी बातमी : कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला एनसीबीकडून क्लिनचिट

"कार्डिलिया क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात आर्यन खान आणि मोहक यांच्याकडे ड्रग्ज मिळालं नाही," असे एनसीबीनं आरोपपत्रात म्हटलं आहे.
Aryan Khan
Aryan Khansarkarnama

मुंबई : अभिनेता शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला एनसीबीनं कॉर्डेलिया क्रूझवर ड्रग्ज पार्टी प्रकरणात (cordelia cruises drug party case) क्लिनचिट दिली आहे. आज एनसीबीनं न्यायालयात या प्रकरणी आरोपपत्र दाखल केले. सहा हजार पानांचे हे आरोपपत्र आहे. यात आर्यनसह सहाजणांना क्लिनचिट देण्यात आली आहे. ( Aryan khan latest news)

कॉर्डेलिया क्रूझवर ड्रग्ज पार्टी प्रकरणात पुराव्यांअभावी सहा जणांविरुद्ध तक्रार दाखल झालेली नाही, तर अन्य १४ जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. एनसीबीला हे आरोपपत्र दाखल करण्यासाठी ६० दिवसांची मुदतवाढ ही २९ मे रोजी संपणार होती आणि त्यापूर्वी एनसीबीने आज आरोपपत्र दाखल केले आहे. (cordelia cruises drug party case news)

विशेष न्यायालयात एनसीबीने आपले अंतिम आरोपपत्र दाखल केले आहे. "कार्डिलिया क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात आर्यन खान आणि मोहक यांच्याकडे ड्रग्ज मिळालं नाही," असे एनसीबीनं आरोपपत्रात म्हटलं आहे.

Aryan Khan
रुपाली ठोंबरेंची बेताल बडबड ; मुंडके छाटण्याची भाषा, चंद्रकांत पाटलांवर निशाणा

क्रूझवर एनसीबीने (NCB) गेल्या वर्षी दोन ऑक्टोबर रोजी कारवाई करीत खळबळ उडवून दिली होती. याच कारवाईत अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक करण्यात आल्याने या प्रकरणाला वेगळ महत्व आले होते. राजकीय क्षेत्रातही यावरुन आरोप-प्रत्यारोप झाले. एनसीबीचे मुंबई विभागाचे तत्कालीन संचालक समीर वानखेडे आणि राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांच्यात आरोपाच्या फेरी झडल्या. यावरुन राजकारण पेटलं होतं.

26 दिवसांच्या कोठडीनंतर मुंबई उच्च न्यायालयानं आर्यन खानला काही अटी शर्तीसह जामीन मंजूर केला होता. समीर वानखेडे यांच्याकडून हा तपास काढून घेण्यात आला होता. एनसीबीच्या दिल्लीतील पथकाची नेमणुक करण्यात आली होती.

Aryan Khan
कुत्र्याला फिरवण्यासाठी खेळाडूंना घरी पाठवणे आयएएस दांपत्याला भोवलं ; तात्काळ बदली

आर्यन खान हा स्वत: तिकीट काढून क्रूझवर पार्टीसाठी गेला नव्हता तर त्याला प्रतीक गाभा आणि आमिर फर्निचरवाला यांनी क्रूझवर नेलं होतं. हा संपूर्ण प्रकार किडनॅपिंग आणि खंडणी वसुलीचा आहे. या प्रकरणाचा मास्टरमाईंड हा मोहित भारतीय आहे असा खळबळजनक दावा नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in