भगवंत मान यांनी मंत्र्यांला डच्चू देताच केजरीवालांच्या डोळ्यात तरळले अश्रू!

तुझ्या आजच्या निर्णयानं माझ्या डोळ्यात अश्रू आले
Bhagwant Mann and Arvind Kejriwal, Bhagwant Mann News Updates, Arvind Kejriwal News, Punjab AAP News
Bhagwant Mann and Arvind Kejriwal, Bhagwant Mann News Updates, Arvind Kejriwal News, Punjab AAP NewsSarkarnama

चंडीगड : विधानसभा निवडणुकीत पंजाबमध्ये मोठा विजय मिळविणाऱ्या आम आदमी पक्षाला (AAP) दोनच महिन्यांत मोठा धक्का बसला आहे. आरोग्यमंत्री विजय सिंगला (Vijay Singla) यांना भ्रष्टाचाराच्या आरोपावरून अटक झाली आहे. यानंतर मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांनी सिंगला यांची तातडीने मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली आहे. याबद्दल बोलताना आपचे संयोजक व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना अश्रू अनावर झाले.

भगवंत मला तुमचा अभिमान वाटतो, असं कौतुक केजरीवालांनी केलं आहे. तुझ्या आजच्या निर्णयानं माझ्या डोळ्यात अश्रू आले. सगळ्या देशाला आज आपचा अभिमान वाटतोय, अशी भावनाही केजरीवालांनी व्यक्त केली. मान यांनी सिंगला यांच्या हकालपट्टीचा घोषणा केली, तो व्हिडीओ केजरीवाल यांनी ट्विट केला आहे. अशाच प्रकारे केजरीवाल यांनीही २०१५ मध्ये भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या अन्न आणि नागरी पुरवठा मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवला होता.

मुख्यमंत्री भगवंत मान यांनी स्वत: सिंगला यांना मंत्रिमंडळातून हकालपट्टी केल्याची घोषणा केली. आरोग्य विभागातील खरेदी व निविदा प्रक्रियेसाठी आरोग्यमंत्री सिंगला एक टक्का कमिशन घेत असल्याच्या तक्रारी होत्या. सिंगला यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर पोलिसांनी सिंगला यांना अटक केली. सिंगला यांना अटक होताच मान यांनी त्यांच्या हकालपट्टीचा निर्णय घेतला. सरकार भ्रष्टाचार आजिबात खपवून घेणार नसल्याचा संदेश त्यांनी यातून दिला आहे.

Bhagwant Mann and Arvind Kejriwal, Bhagwant Mann News Updates, Arvind Kejriwal News, Punjab AAP News
मुख्यमंत्र्यांनी करुन दाखवलं! भ्रष्टाचाराचे आरोप होताच मंत्र्याची थेट हकालपट्टी

याबाबत बोलताना मुख्यमंत्री मान म्हणाले की, आरोग्य विभागातील खरेदी अथवा निविदा प्रक्रियेसाठी मंत्री एक टक्का कमिशन घेत असल्याचे माझ्या निदर्शनास आले. हे प्रकरण मी अतिशय गांभीर्याने घेतले. हे फक्त मलाच माहिती होते. विरोधी पक्ष अथवा प्रसारमाध्यमांनाही याबद्दल काही माहिती नव्हते. या मंत्र्यावर मी कठोर कारवाई करत आहे. त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करत आहे. पोलिसांनाही त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले असून, या मंत्र्याचे नाव विजय सिंगला आहेत.

Bhagwant Mann and Arvind Kejriwal, Bhagwant Mann News Updates, Arvind Kejriwal News, Punjab AAP News
माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाचा पत्ता कट? प्रदेशाध्यक्षांनी दाखवलं हाय कमांडकडं बोट

आरोग्य विभागातील चुकीच्या गोष्टीत सहभागी झाल्याची कबुली आरोग्यमंत्री सिंगला यांनी दिल्याचा दावाही मुख्यमंत्री मान यांनी केला आहे. भ्रष्टाचार खपवून न घेण्याची 'आप'ची भूमिका आहे. पंजाबमध्ये आपचे सरकार स्थापन झाल्यानंतर दोनच महिन्यांत एक मंत्री भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अडकल्याने आपची कोंडी झाली आहे. आता मंत्र्याची हकालपट्टी करत मुख्यमंत्र्यांनी प्रतिमासुधार सुरू केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com