राजकारण तापलं! केजरीवालांची विधानसभेतच भाजप आमदारांना खुली ऑफर

अरविंद केजरीवालांनी विधानसभेतच थेट भाजप आमदारांना आपमध्ये येण्याची ऑफर देऊन खळबळ उडवून दिली आहे.
Arvind Kejriwal Vs BJP News,
Arvind Kejriwal Vs BJP News, Sarkarnama

नवी दिल्ली : पंजाबच्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने (AAP) जोरदार विजय मिळवला आहे. यामुळे राष्ट्रीय पातळीवर भाजपला (BJP) रोखण्यासाठी आपकडे पाहिले जात आहे. आपचे संयोजक व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) हे आता केंद्र सरकारसह पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) विरोधात आक्रमक झाल्याचे दिसत आहे. यातच आता केजरीवालांनी विधानसभेतच थेट भाजप आमदारांना आपमध्ये येण्याची ऑफर देऊन खळबळ उडवून दिली आहे. (Arvind Kejriwal Vs BJP News)

दिल्लीतील तीन महापालिका एकत्र करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यावरून आप विरुद्ध भाजप असा वाद सुरू आहे. या वादावर बोलताना त्यांनी विधानसभेत थेट सभागृहात बसलेल्या आमदारांना आपमध्ये येण्याची ऑफर दिली. यामुळे सभागृहातील भाजप आमदारही अवाक झाले. केजरीवाल म्हणाले की, भाजप त्यांच्या आमदारांना मेंढराप्रमाणे हाकत आहेत. आधी तीन कृषी कायदे आणले आणि सगळ्यांना सांगितले याला मास्टरस्ट्रोक म्हणा. कायदे मागे घेतल्यानंतर म्हणाले, मोदीजींचा मास्टरस्ट्रोक. काय तुमचे भाजपवाल्यांनी हाल चालवले आहेत. रोज वरून काही तरी काम तुम्हाला दिले जाते. तुम्ही आता देशाचा विचार करा. हिटलरने चमच्यांना रोजगार दिला होता. तुम्हाला भाजपकडून काय मिळाले? तुमच्या मदतीला केजरीवाल येतो मोदी नाही. तुम्ही आता डोळे उघडा. भाजपच्या सगळ्या आमदारांनी आपमध्ये यावे.

Arvind Kejriwal Vs BJP News,
करुणा शर्मांचं असंही राजकारण! जिंकल्यावर काय करणार याचं अॅफिडेव्हिटच केलं सादर

'द काश्मीर फाईल्स' (The Kashmir Files) चित्रपटावरुन सध्या मोठा प्रमाणात गदारोळ सुरू आहे. हा चित्रपट उत्तर प्रदेश, बिहार, उत्तराखंड, चंडीगड आणि हिमाचल प्रदेशमध्ये करमुक्त करण्यात आला आहे. दिल्लीच्या विधानसभा अधिवेशनात भाजपच्या आमदारांनी काश्मीर फाईल्स चित्रपट करमुक्त करण्याची मागणी लावून धरली होती. यावर उत्तर देताना केजरीवाल म्हणाले की, हा चित्रपट सगळ्यांनी पाहावा, अशी भाजपची इच्छा आहे. अशीच इच्छा चित्रपटाचा निर्माता विवेक अग्निहोत्री याचीही आहे. त्यामुळे हा चित्रपट करमुक्त करण्याची मागणी करण्याऐवजी हा चित्रपट त्यांनी सरळ यूट्यूबवर प्रदर्शित करावा. यामुळे तो सगळ्यांनाच फुकट पाहता येईल.

Arvind Kejriwal Vs BJP News,
बंगाल पेटला! वीरभूमनंतर तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांवर हल्ल्याचे सत्र

केजरीवाल यांनी मोदींवर या निमित्ताने निशाणा साधला. ते म्हणाले की, देशातील सगळे भाजपवाले या चित्रपटाचे गल्लीबोळात पोस्टर लावत फिरत आहेत. यासाठीच तुम्ही राजकारणात आला होता का? तुमच्या मुलांना तुम्ही काय उत्तर द्याल? केंद्रात 8 वर्षे सरकार चालवल्यानंतर देशाचा पंतप्रधानाला विवेक अग्निहोत्रीच्या पायात शरण घ्यावी लागत आहे. याचाच अर्थ त्या पंतप्रधानांनी आठ वर्षे काहीही काम केलेले नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com