दिल्ली महापालिकेत भाजप जिंकल्यास केजरीवाल राजकारण सोडणार...

BJP|AAP|Delhi|Arvind Kejriwal: छोट्या महापालिका निवडणुकीत तुमचा पराभव टाळण्यासाठी या देशातील हुतात्म्यांच्या हौतात्म्याशी खेळू नका, अशी टीका केजरीवाल यांनी भाजपवर केली आहे.
Arvind kejriwal & Narendra Modi
Arvind kejriwal & Narendra ModiSarkarnama

नवी दिल्ली : दिल्लीतील तीनही महानगरपालिकांच्या विलिनीकरणास केंद्रीय मंत्रिमंडळाने (Central Gogvernment) काल (ता.22 मार्च) मान्यता दिली. त्यामुळे या महानगरपालिकांच्या येत्या काळात होणाऱ्या निवडणुका लांबणीवर पडण्याची चिन्हे आहे. त्यावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी भाजपवर (BJP) जोरदार टीका केली आहे. दिल्ली महानगरपालिकेच्या निवडणुका (Delhi Municipal Election) वेळेवर घ्या आणि जिंकून दाखवा. आम्ही राजकारण सोडून देऊ, अशा शब्दांत केजरीवाल यांनी भाजपला आव्हान दिले आहे.

Arvind kejriwal & Narendra Modi
युक्रेनचे अध्यक्ष ठाकरेंची मदत घेणार; त्यांच्याकडे शक्तीशाली टोमणा बॉम्ब आहे

निवडणुका पुढे ढकलल्याबद्दल माध्यामांशी बोलताना केजरीवाल म्हणाले, "छोट्या महापालिका निवडणुकीत तुमचा पराभव टाळण्यासाठी या देशातील हुतात्म्यांच्या हौतात्म्याशी खेळू नका. या देशाच्या संविधानाशी खेळू नका. आज तिन्ही महापालिका एकत्र करणार आहोत, असे तुम्ही सांगत आहात. त्यामुळेच निवडणुका पुढे ढकलल्या जात आहेत. या आधारावर निवडणुका पुढे ढकलता येतील का? उद्या गुजरातची निवडणूक आहे, निवडणूक आयोगाला हे पत्र लिहितील की गुजरात आणि महाराष्ट्र एकत्र करणार आहोत, त्यामुळे निवडणुका घेऊ नका. पुढच्या वेळी लोकसभा निवडणुका होणार आहेत. लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा पराभव होणार आहे. त्यावेळीही आयोगाला पत्र लिहितील की निवडणुका पुढे ढकला. निवडणुका अशा पुढे ढकलता येतील का?," असा सवाल उपस्थित करत केजरीवाल यांनी भाजपवर टीका केली.

Arvind kejriwal & Narendra Modi
'आप'चा दे धक्का! एकाच फटक्यात 5 खासदार निवडून आणले

आपल्या पराभवाच्या भीतीने हे लोक निवडणुका पुढे ढकलत आहेत. मी पंतप्रधानांना विनंती करतो की उद्या भाजप राहील की नाही, आम आदमी पार्टी राहील की नाही, मोदी जगतील की राहतील, केजरीवाल असतील की नसतील. पण देश वाचवला पाहिजे. छोटी निवडणूक जिंकण्यासाठी तुम्ही देशाच्या व्यवस्थेशी खेळत आहात. हे अजिबात मान्य नाही. भाजप हा जगातील सर्वात मोठा पक्ष असल्याचे सांगतात. अहो, तुम्ही सर्वात मोठा पक्ष असाल तर दिल्लीतल्या छोट्या पक्षाला घाबरता? दिल्लीतील छोट्या महापालिकेच्या निवडणुकीची तुम्हाला भीती का वाटते? भाजपमध्ये हिंमत असेल, तर निवडणुकीच्या वेळी दाखवा आणि जिंकून दाखवा, आम्ही राजकारण सोडू, असे खुले आव्हान केजरीवाल यांनी भाजपला दिले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in