पंजाबच्या मुख्यमंत्री उमेदवाराबाबत केजरीवाल करणार आज घोषणा

अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) आम आदमी पक्षाच्या पंजाबच्या  मुख्यमंत्र्यांच्या (Punjab CM candidate)चेहऱ्याबाबत आज मोठी घोषणा करू करण्याची शक्यता आहे.
Arvind Kejriwal
Arvind Kejriwalsarkarnama

चंदिगढ: विधानसभा निवडणुकीच्या आधी पंजाबमध्ये राजकीय वातावरण तापलं आहे. एका बाजुला काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस सुरु आहे. तर दुसरीकडे अकाली दलाने भाजपशी काडीमोड केल्यानंतर बसपाशी हात मिळवला आहे.

''आम आदमी पक्षाचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार हा शीख समुदायातील असेल,'' अशी घोषणा केजरीवाल यांनी काही दिवसापूर्वी केली. ''अख्ख्या पंजाबला त्याच्यावर गर्व असेल,'' असंही केजरीवाल म्हणाले. या पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे आज महत्वाची घोषणा करणार आहेत. ते दोन दिवसांच्या दैाऱ्यावर दौऱ्यावर पंजाबला पोहोचले आहेत.

Arvind Kejriwal
ठाकरेंच्या या निर्णयावर राज्यपाल पहिल्यांदाच खुषीने सही करणार

अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) आम आदमी पक्षाच्या पंजाबच्या  मुख्यमंत्र्यांच्या (Punjab CM candidate)चेहऱ्याबाबत आज मोठी घोषणा करू शकतात, अरविंद केजरीवाल म्हणाले की ''आपचा मुख्यमंत्री उमेदवार पंजाबचा अभिमान असेल.'' काल रात्री केजरीवाल यांनी आपल्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. व्यापाऱ्यासाठी पाच महत्वपूर्ण घोषणा ते करणार असल्याचे समजते

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com