Artical 370 : मध्यरात्री दोन वाजता फोन, सकाळी सातला मिटींग अन चाळीस दिवसांत रचला इतिहास; वाचा सविस्तर..

2019 मध्ये दक्षिण काश्मीरमधील लेथपोराजवळ आत्मघाती कार बॉम्ब हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या 40 जवान शहीद झाले होते
Amit Shah
Amit Shah Sarkarnama

Artical 370 : जम्मू आणि काश्मीरमधील कलम 370 हटवण्यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 2019 मध्ये श्रीनगरला भेट दिली होती. त्यांनी लष्कराचे कमांडर कंवलजीत सिंग धिल्लन (KJS Dhillon) यांची भेट घेऊन अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली होती. या बैठकीच्या 40 दिवसांनंतर सरकारने जम्मु-काश्मीर ला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द करण्याची घोषणा केली. जेव्हा हा निर्णय घेण्यात आला तेव्हा धिल्लन काश्मीरमधील स्थानिक लष्कर कमांडचे प्रमुख होते.

2019 मध्ये दक्षिण काश्मीरमधील लेथपोराजवळ आत्मघाती कार बॉम्ब हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या 40 जवान शहीद झाले. या जवानांच्या स्मरणार्थ धिल्लन यांचे 'कितने गाजी आये कितने गाझी गए' हे पुस्तक 14 फेब्रुवारी रोजी प्रकाशित होणार आहे. धिल्लन यांनी त्यांच्या नव्या पुस्तकात कलम 370 हटवल्याच्या घटनेचा उल्लेख केला आहे.

Amit Shah
Rupali Chakankar : उर्फी जावेद प्रकरणी वाघांचे गंभीर आरोप,अखेर चाकणकरांनी मौन सोडलं; म्हणाल्या..

धिल्लन यांनी त्यांच्या पुस्तकात सांगितले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह 26 जून 2019 रोजी श्रीनगरच्या दौऱ्यावर आले होते. मध्यरात्री 2 वाजता मला फोन आला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता गृहमंत्र्यांसोबत बैठक असल्याचे सांगण्यात आले. या दौऱ्यासंदर्भात आगामी काळात काही मोठी घोषणा होण्याची शक्यता आधीपासूनच वर्तवली जात होती. या भेटीनंतर 2019 मध्ये जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 करण्यात रद्द करण्यात आले आणि राज्याचे केंद्रशासित प्रदेश-जम्मू आणि काश्मीर आणि लेह-लडाखमध्ये विभाजन करण्यात आले.

या बैठकीत अनेक संवेदनशील विषयांवर चर्चा झाल्या. त्यात "पाथ ब्रेकिंग डिक्लेरेशन" ला पाकिस्तानचा प्रतिसाद समजून घेणे देखील समाविष्ट होते. बैठकीच्या शेवटी अमित शहा यांना त्यांच्या वैयक्तिक विचारांबद्दल विचारले असता, त्यांनी इतिहास रचण्याचा उद्देश असल्याचे सांगितले. असेही धिल्लन यांनी त्यांच्या पुस्तकात नमुद केले आहे. “इतिहास लिहायचा असेल तर कुणीतरी इतिहास घडवावा लागेल, अशी प्रतिक्रिया मी लगेच दिली होती.” 5 ऑगस्ट 2019 रोजी सरकारने कलम 370 रद्द करण्याची घोषणा करण्यापूर्वी श्रीनगरमध्ये अमित शहा यांची ही शेवटची बैठक होती. असंही धिल्लन यांनी म्हटलं आहे.

तसेच, सीमेपलीकडून होणारी घुसखोरी रोखणे आवश्यक असल्याने त्या काळात राज्यात इंटरनेट सेवा बंद ठेवावी लागली. शिवाय जीवित व वित्तहानी होण्याचाही धोका होता. "शेवटी, मी इतकचं अभिमानाने सांगेन की एक उद्दिष्ट साध्य झाले. असेही त्यांनी आपल्या पुस्तकात नमुद केलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com