मुंडन अन् गंगाजल शिंपडत दोनशे कार्यकर्त्यांनी भाजपला ठोकला रामराम

भाजपचे आणखी काही आमदार पक्ष सोडण्याचीचर्चा सुरू आहे.
Around 200 BJP workers rejoin Trinamool Congress
Around 200 BJP workers rejoin Trinamool Congress

कोलकता : पश्चिम बंगालमधील निवडणूक (West Bengal Election) निकालानंतर भाजपला अजूनही धक्के बसत आहेत. राष्ट्रीय उपाध्यक्ष व त्यांच्या मुलाने पक्षाला सोडचिट्ठी दिल्यानंतर आणखी सात नेत्यांनी नुकताच तृणमूलमध्ये प्रवेश केला. भाजपचे आणखी काही आमदार तृणमूलच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू असतानाच 200 हून अधिक कार्यकर्त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत घरवापसी केली. (Around 200 BJP workers rejoin Trinamool Congress)

बंगालमधील हुगळी जिल्ह्यातील हे कार्यकर्ते आहेत. भाजपमध्ये गेल्याचे प्रायश्चित म्हणून या कार्यकर्त्यांनी मुंडन केले. त्यानंतर गंगाजल शिंपडत तृणमूलमध्ये प्रवेश केला आहे. खासदार अपरूपा पोद्दार यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी घरवापसी केली. पक्षाकडून मंगळवारी आयोजित अन्नधान्य वितरणाच्या कार्यक्रमातच या कार्यकर्त्यांचा प्रवेश झाला. 

दलित समाजातील काही लोकांनी तृणमूलमध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली होती. या लोकांनी भाजपमध्ये जाऊन चूक केल्याचे म्हटले. त्यामुळं त्यांना प्रवेश दिल्याची माहिती पोद्दार यांनी दिली. बंगालमध्ये भाजपचा पराभव झाल्यानंतर अनेकजण घरवापसी करू लागले आहे. अनेक जिल्ह्यांतील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर तृणमूलमध्ये दाखल होत असल्याने भाजपला धक्का बसला आहे. 

भाजपने या पक्षप्रवेशांवर टीका केली आहे. निवडणूक निकालानंतर राज्यात झालेल्या हिंसाचाराला कार्यकर्ते घाबरले आहेत. त्यांना तृणमूलमध्ये येण्यासाठी धमकावले जात असल्याचा आरोप भाजपने केला आहे. कार्यकर्ते भीतीच्या वातावरण असल्याने भाजपला सोडत असल्याचे भाजप नेत्यांचे म्हणणे आहे. 

दरम्यान, भाजपचे उत्तर बंगालमधील खासदार जॅान बारला यांनी बंगालच्या विभाजनाची मागणी केली आहे. त्यांना याच भागातील भाजपच्या आणखी एका खासदाराने पाठिंबा दिला आहे. त्यानंतर बारला यांच्या अलीपुरदौर मतदारसंघातील भाजपचे जिल्हाध्यक्ष गंगा प्रसाद शर्मा यांनी थेट राजीनाम्याचे अस्त्र उगारले आहे. त्यांनी नुकताच तृणमूलमध्ये प्रवेश करत भाजपवर टीकास्त्र सोडले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com