दासगुप्तांच्या फॉरेन टूरसाठी अर्णब गोस्वामींकडून 12 हजार डॉलर अन् 40 लाख रुपये

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी हे बनावट टीआरपी प्रकरणात चांगलेच अडचणीत आले आहेत.
arnab goswami paid 14 thousand dollars and 40 lacs rupees to partho dasgupata
arnab goswami paid 14 thousand dollars and 40 lacs rupees to partho dasgupata

मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी आणि ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिलचे (बीएआरसी) माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्यातील वादग्रस्त व्हॉट्सअॅप चॅट उघड झाल्याने खळबळ उडाली होती. आता गोस्वामींनी टीआरपी वाढवण्यासाठी दासगुप्ता यांना विदेशातील दोन सहलींसाठी 12 हजार डॉलर आणि 40 लाख रुपये तीन वर्षांच्या कालावधीत देण्यात आले होते, अशी खळबळजनक बाब समोर आली आहे. दासगुप्ता यांनी पोलिसांसमोर लेखी जबाबात याची कबुली दिली आहे. 

बनावट टीआरपी प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी अडचणीत आले आहेत. या प्रकरणी रिपब्लिक टीव्हीच्या काही अधिकाऱ्यांना अटक झाली असून, चौकशीचा फेरा सुरू आहे. या प्रकरणी पोलिसांनी ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिलचे (बीएआरसी) माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्ता यांना अटक केली होती. त्यांच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली होती. गोस्वामी हे रिपब्लिक टीव्हीचा टीआरपी वाढवण्यासाठी दासगुप्ता यांना लाखो रुपये देत असल्याची खळबळजनक बाब तपासात समोर आली होती. 

बनावट टीआरपी प्रकरणात पोलिसांनी 11 जानेवारीला पुरवणी आरोपपत्र दाखल केले होते. यात बीएआरसीच्या फॉरेन्सिक ऑडिटचाही समावेश होता. तसेच, गोस्वामी आणि दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअॅप चॅट आणि 59 व्यक्तींचे जबाबही न्यायालयात सादर करण्यात आले आहेत. 

दासगुप्ता यांचा लेखी जबाब मागील वर्षी 27 डिसेंबरला नोंदवण्यात आला होता. दोन साक्षीदारांसमोर तो नोंदवण्यात आला होता. यात त्यांनी म्हटले आहे की, मी अर्णब गोस्वामींना 2004 पासून ओळखतो. टाईम्स नाऊमध्ये आधी आम्ही एकत्र काम करीत होतो. मी बीएआरसीमध्ये 2013 मध्ये रूजू झालो. गोस्वामी यांनी 2017 मध्ये रिपब्लिक सुरू केले. रिपब्लिक टीव्हीची सुरवात करण्याआधीही ते मला वृत्तवाहिनी सुरू करुन चांगले रेंटिग कसे मिळवावे, अशी विचारणा करीत होते. रिपब्लिक टीव्हीला पहिल्या क्रमांकाचे रेटिंग मिळावे, यासाठी मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी काम केले. ते 2017 पासून 2019 पर्यंत सुरू होते. 

गोस्वामी हे मला लोअर परेल येथील सेंट रेजिस हॉटेलमध्ये 2017 मध्ये भेटले होते. त्यावेळी फ्रान्स आणि स्वित्झर्लंडच्या फॅमिली टूरसाठी त्यांनी मला सहा हजार डॉलर दिले होते. त्यानंतर 2019 मध्ये स्वीडन आणि डेन्मार्कच्या फॅमिली टूरसाठी आणखी सहा हजार डॉलर दिले होते. याचबरोबर गोस्वामींना 40 लाख रुपये मला दिले होते.

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com