आता माघार नाही! लष्कराने आंदोलकांना इशारा देत केली महत्वाची घोषणा

अग्निपथ योजनेनंतर देशातील अनेक राज्यांमध्ये तरूण रस्त्यावर उतरले आहेत.
Agnipath Latest Marathi News, Lt General Anil Puri News
Agnipath Latest Marathi News, Lt General Anil Puri NewsSarkarnama

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेवरून देशभरात आगडोंब उसळला आहे. त्यानंतर रविवारी लष्कराच्या तीनही दलांनी संयुक्तपणे पत्रकार परिषद घेत योजना रद्द केली जाणार नाही, असं स्पष्ट केलं आहे. तसेच योजनेविरोधात आंदोलन करणाऱ्यांनाही कडक इशारा दिला आहे. (Agnipath Latest Marathi News)

अग्निपथ योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुकांना आता अर्ज करताना लिहून द्यावे लागणार आहे. योजनेविरोधात हिंसा आणि तोडफोड कऱणाऱ्यांमध्ये आपला सहभाग नव्हता, असं अर्जात नमूद करावं लागेल. तसेच आंदोलनादरम्यान FIR दाखल झाल्यास संबंधितांना अग्निवीर होता येणार नाही. पोलीस व्हेरिफिकेशन केले जाईल, असा इशारा लेफ्टनंट जनरल अनिल पुरी यांनी पत्रकार परिषदेत दिला.

Agnipath Latest Marathi News, Lt General Anil Puri News
हिंदुस्थान पेटणार..! भाजप नेत्याकडून राहुल गांधींचा 'तो' व्हिडीओ व्हायरल

आंदोलन करणाऱ्यांनी ही योजना नेमकी काय आहे, हे माहिती नाही. त्यांना भडकवले जात आहे. या योजनेवर मागील दोन वर्षांपासून काम सुरू होते. यातील प्रत्येक बारकावे पाहण्यात आले आहेत. युवकांच्या समस्या जाणून घेत वयाची मर्यादा दोन वर्षांनी वाढवली, असंही पुरी यांनी स्पष्ट केलं.

आम्हाला 'यंग आर्मी' हवी आहे. ही योजना आता रद्द केली जाणार नाही. अग्निवीर चार वर्षांनंतर काय करणार, असा प्रश्न विचारणाऱ्यांना आम्ही सांगू इच्छितो की, आपल्या देशातील 85 उद्योगांनी म्हटलं आहे की, ते अग्निवीरांना घेऊ इच्छितात, पण ते एका रात्रीत शक्य नाही, असं पुरी यांनी सांगितलं.

वायु सेनेचे कार्मिक प्रभारी एअर मार्शल सुरज झा म्हणाले, आता सगळी भरती केवळ अग्निवीरच्या माध्यमातून होईल. वयाची मर्यादा वाढवण्यात आली आहे. जे पात्र असतीलस, त्यांना पुन्हा अर्ज करावे लागतील. त्यांची पुन्हा चाचणी घेतली जाईल. त्यानंतर हवाई दलात त्यांची निवड केली जाईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com