सीडीएस बिपीन रावत यांचा उत्तराधिकारी कोण? ही नावे चर्चेत

सेवाज्येष्ठतेनुसार सीडीएस पदासाठी लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे ( m m naravane) यांचे नाव आघाडीवर आहे.
 m m naravane
m m naravanePTI

नवी दिल्ली : देशाचे , चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत (Bipin Rawat) यांचे बुधवारी लष्करी हेलिकॉप्टर दुर्घटनेत निधन झाले. भारतीय लष्कराचे प्रमुख एम. एम. नरवणे, नौदल प्रमुख आर. हरी कुमार, हवाई दलाचे प्रमुख व्ही. आर. चौधरी यांनीही बिपिन रावत आणि हेलिकॉप्टर अपघातात मृत्युमुखी पडलेल्या इतरांना श्रद्धांजली वाहिली. बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नीचे पार्थिव कामराज मार्गावरील त्यांच्या निवासस्थानी सकाळी ११ ते १२.३० या सुमारास सर्वसामान्यांना अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.

शुक्रवारी दिल्लीत पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नीची अंत्ययात्रा कामराज मार्गावरून निघून दिल्ली कॅन्टोेन्मेंटमधील बार स्क्वेअर स्मशानभूमीत अंत्य संस्कार होणार आहेत. तर ब्रिगेडियर एल. एस. लिड्डर यांच्या पार्थिवावर सकाळी ९.१५ वाजता दिल्ली कॅन्टोन्मेंट येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, असे भारतीय लष्कराकडून सांगण्यात आले.

 m m naravane
जळगाव जिल्हा बॅक राष्ट्रवादीकडे आली अन् पवारांनी दिला हा सल्ला

रावत यांचा उत्तराधिकारी म्हणून कोणाची निवड करावी यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सुरक्षाविषयक कॅबिनेट समितीची बैठक नुकतीच झाली. सेवाज्येष्ठतेनुसार सीडीएस पदासाठी लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे ( m m naravane) यांचे नाव आघाडीवर आहे.

 m m naravane
टिव्हीवरील जाहिराती, मोदींच्या भाषणाला भूलू नका ; कन्हैय्याकुमारांचा टोला

नरवणे यांच्यासह हवाईदल प्रमुख व्ही. आर. चौधरी आणि नौदल प्रमुख आर. हरी कुमार यांच्याही नावांची चर्चा आहे. चौधरी यांनी ३० सप्टेंबर २०२१ रोजी हवाई दल प्रमुखपदाची सूत्रे स्वीकारली. तर नौदल प्रमुख आर. हरी कुमार यांनी ३० नोव्हेंबर २०२१ रोजी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. मात्र, यात सेवाज्येष्ठतेनुसार नरवणे हे रावत यांचे उत्तराधिकारी होऊ शकतात.

बुधवारी भारतीय हवाई दलाचे हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत देशाच्या तिन्ही संरक्षण दलाचे प्रमुख बिपीन रावत, त्यांची पत्नी मधुलिका रावत व अन्य ११ अधिकार्‍यांचे निधन झाले असून या दुर्घटनेत हवाई दलाचे शौर्यचक्र विजेते ग्रुप कॅप्टन वरुण सिंह हे एकटेच बचावले आहेत. वरुण यांची प्रकृती अजूनही चिंताजनक असून त्यांना अधिक उपचारासाठी बेंगळुरू येथे हलवण्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com