अँटीबॉडीजमुळे कोरोनापासून संरक्षण नाही..काय म्हणताहेत संशोधक वाचा...

तुमच्या शरीरीत अँडीबॉडीज तयार झाल्या असतील तर कोरोना संसर्गापासून बचाव होईलच असे नाही. संशोधनातून हा धक्कादायक निष्कर्ष समोर येत आहे.
antibodies can not protect from covid19 infection says researchers
antibodies can not protect from covid19 infection says researchers

नवी दिल्ली : देशभरात कोरोनाचा कहर वाढलेला असून, रुग्णसंख्येच्या बाबतीत भारत जगात दुसऱ्या स्थानी पोचला आहे. तुमच्या शरीरात अँटीबॉडीज तयार झाल्या असतील तर कोरोनाच्या संसर्गापासून तुमचा बचाव होऊ शकतो, असा मतप्रवाह संशोधकांमध्ये होता. आता नव्या संशोधनांतून याला छेद मिळाला आहे. अँटीबॉडीजमुळे नेहमीच कोरोना अथवा सार्सच्या विषाणूंपासून संरक्षण होत नाही. या अँटीबॉडीज मानवी शरीरामध्ये किती काळ टिकतात आणि टिकाव धरणारे त्यांचे अन्य उपप्रकार कोणते आहेत, याचा अंदाज करणे कठीण असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. 

देशातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील कोरोना रुग्णांची संख्या 42 लाख 80 हजारांवर पोचली आहे. याचबरोबर कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 72 हजार 775 झाली आहे. मागील 24 तासांत देशात कोरोनाचे 75 हजार 809  रुग्ण सापडले असून, 1 हजार 133 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काही दिवसांपूर्वी शरीरातील अँटीबॉडीजमुळे मानवी शरीरात काही सकारात्मक बदल घडून येत असल्याचे आढळून आले होते. संशोधक आता याचा अभ्यास करीत आहेत. 

एखाद्या व्यक्तीच्या शरीरात या अँटीबॉडीज आढळून आल्या तर त्यावरून त्या व्यक्तीला याआधी कोरोनाची बाधा झाली होती, हा निष्कर्ष काढता येतो. अँटीबॉडीजच्या परिणामांबाबत संशोधकांमध्ये एकवाक्यता नाही. याबाबत केवळ वेगवेगळे अंदाज वर्तविण्यात येत आहेत. संशोधनातून नव्याने आता हाती आलेले पुरावे आपल्याला नेमके कोणत्या दिशेला घेऊन जातात, हे काळजीपूर्वक तपासावे लागेल, असे विषाणूतज्ज्ञ सत्यजित रथ यांनी सांगितले. 

एखाद्या व्यक्तीच्या शरीरात अँटीबॉडीज आढळल्या असतील तर त्याच्या शरीरामध्ये विषाणूंचा कशाप्रकारे प्रसार होतो आहे? हे स्पष्टपणे सांगता येत नाही, असे दिल्लीतील राष्ट्रीय विषाणू संस्थेतील संशोधकांचे म्हणणे आहे. 

'एनएबीएस' या अँटीबॉडीज कोरोना विषाणूंचा प्रसार रोखू शकतात. शरीराच्या विविध भागांमध्ये या अँटिबॉडीजची निर्मिती होते, असे पुण्यातील 'आयसर' या संस्थेतील संशोधक विनिता बाल यांनी सांगितले. देशाच्या विविध भागांमध्ये याआधी सिरो सर्वेक्षण करण्यात आले होते परंतु त्यातही देखील अँटीबॉडीजचा प्रभाव उघड झालेला नाही. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com