गुजरातमध्ये काँग्रेसला आणखी एक धक्का; एका आमदाराचा राजीनामा 

राज्यसभा निवडणुकीपूर्वीकाँग्रेसला हा आणखी एक धक्का बसला आहे. गुजरातमध्ये आणखी एका आमदाराने राजीनामा दिला.
गुजरातमध्ये काँग्रेसला आणखी एक धक्का; एका आमदाराचा राजीनामा 
congress-flag

गांधीनगर : गुजरातमध्ये काँग्रेसच्या आणखी एका आमदाराने आज राजीनामा दिला. त्यामुळे राजीनामा दिलेल्या आमदारांची संख्या पाच झाली आहे. राज्यसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला हा आणखी एक धक्का बसला आहे. 

गुजरातचे विधानसभाअध्यक्ष राजेंद्र त्रिवेदी यांनी सभागृहालाही पाच काँग्रेस आमदारांनी राजीनामे दिल्याची माहिती आज दिली. प्रवीण मारू, प्रद्युम्नसिंह जडेजा, सोमा कोली पटेल, जे. व्ही. काकडिया आणि मंगल गावित अशी राजीनामा दिलेल्या आमदारांची नावे आहेत.  

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in