अंकिता लोखंडे म्हणाली, तो फ्लॅट माझाच अन् ईएमआयही मीच भरते..!

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूच्या तपासावरून गदारोळ सुरू आहे. आता अंकिता लोखंडे हिच्यावर आरोप करण्यात आले असून, तिने या प्रकरणी मोठा खुलासा केला आहे.
ankita lokhande denies allegation about sushant singh rajput paying emi of flat
ankita lokhande denies allegation about sushant singh rajput paying emi of flat

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणी सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागानेही (सीबीआय) गुन्हा दाखल केला आहे. या संपूर्ण प्रकरणात मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. सुशांतची पूर्वाश्रमीची प्रेयसी अंकिता लोखंडे ही राहत असलेल्या फ्लॅटचा ईएमआय सुशांतच्या बँक खात्यातून जात होता, अशी चर्चा सुरू झाली होती. आता या प्रकरणी अंकिताने मोठा खुलासा केला आहे.

सुशांतच्या मृत्यूप्रकरणी त्याचे पिता के.के.सिंह पाटण्यातील राजीवनगर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला होता. यानंतर तपासावरून महाराष्ट्र आणि बिहार सरकार एकमेकांविरोधात उभे राहिल्याचे चित्र निर्माण झाले आहे. दोन राज्यांचे पोलीस या प्रकरणाचा तपास करीत असताना यात ईडीनेही उडी घेतली. सुशांतचा मृत्यू आणि आर्थिक अनियमतितेप्रकरणी ईडीने रिया हिच्यासह सहा जणांवर करचुकवेगिरी प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. सीबीआयने या प्रकरणी रिया चक्रवर्ती, तिचे पिता इंद्रजित, आई संध्या, भाऊ शोविक, सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युएल मिरांडा आणि बिझनेस मॅनेजर श्रुती मोदी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. 


सुशांतच्या बँक खात्यातून त्याची पूर्वाश्रमीची प्रेयसी अंकिता लोखंडे ही राहत असलेल्या फ्लॅटचा ईएमआय कपात होऊन जात होता. हा फ्लॅटही सुशांतच्या नावावर असून, तो मालाडमध्ये आहे, अशी चर्चा सुरू झाली होती. अंकिता आणि सुशांत हे सुमारे 6 वर्षे एकत्र राहत होते. सुशांतशी ब्रेकअप झाल्यानंतर अंकिता हिचे उद्योगपती विक्की जैन याच्याशी प्रेमसंबंध जुळले. त्याचवेळी रिया चक्रवर्ती सुशांतच्या आयुष्यात आली. 

सुशांतच्या मृत्यूप्रकरणी सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी अंकिताने केली होती. याचबरोबर तिने सुशांतच्या मृत्यूबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले होते. तिने अनेक वृत्तवाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीत सुशांत आणि तिच्या संबंधाविषयी जाहीरपणे माहिती दिली होती. परंतु, आता तिच्यावरच आरोप झाल्याने तिने खुलासा केला आहे. तिने इन्स्टाग्रामवर तो फ्लॅट तिच्याच नावावर असल्याची कागदपत्रे आणि त्याचा ईएमआय तिच्याच बँक खात्यातून जात असल्याचा पुरावा म्हणून बँक खात्याचे स्टेटमेंटही दिले आहे. 

इन्स्टाग्रामवरील पोस्टमध्ये तिने म्हटले आहे की, सर्व प्रकारच्या चर्चा मी बंद करण्याच्या उद्देशाने हे करत आहे. यात पारदर्शकता असावी, असे मला वाटते. माझ्या फ्लॅटचे रजिस्ट्रेशन आणि ईएमआय कपात होत असल्याचा पुरावा म्हणून मी बँक स्टेटमेंटही दिले आहे. यापेक्षा मी अधिक काही सांगू इच्छित नाही. 

सुशांत हा 14 जूनला मुंबईतील घरी मृतावस्थेत सापडला होता. याचा तपास मुंबई पोलिस करीत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत 56 जणांचे जबाब नोंदविले आहेत. यात सुशांतचे कुटुंबीय, त्याचे मित्र, अभिनेत्री रिया चक्रवर्ती, कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांच्यासह इतर काही जणांचा समावेश आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com