योगी सरकारमधील माजी मंत्री आखणार भाजपच्या पराभवासाठीची रणनिती...

अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी सुहेलदेव भारतीय समाजचे अध्यक्ष ओम प्रकाश राजभर (Om Prakash Rajbhar) यांच्यासोबत एक फोटो देखील पोस्ट केला आहे.
Akhilesh yadav and Om prakash Rajbhar
Akhilesh yadav and Om prakash RajbharTwitter

लखनऊ : उत्तरप्रदेशमध्ये पुढच्या वर्षी विधानसभेच्या निवडणूका होत आहेत. त्यामुळे सध्या तिथे अनेक नवी राजकीय समीकरण देखील आकार घेवू लागली आहेत. वाऱ्याची दिशा ओळखत इतर पक्षामधील नेते पक्षांतर करत नवीन पक्षामध्ये प्रवेश करत आहेत. तर काही पक्ष युती करत एकत्र येत आपली ताकद वाढवताना दिसत आहेत. अशात आता कधी काळी भाजपचा साथीदार असलेल्या सुहेलदेव भारतीय समाजवादी पक्षाला समाजवादी पक्षाच्या रुपात नवा मित्रपक्ष मिळाला आहे. समाजवादी पक्षाने ट्विटरवरुन याबाबत माहिती दिली आहे.

Akhilesh yadav and Om prakash Rajbhar
समाजवादी पक्षाच्या खासदाराविरोधात राष्ट्रद्रोहाचा गुन्हा

समाजवादी पक्षाने दोन्ही पक्ष एकत्र येत निवडणूक लढवण्याची घोषणा करताना सांगितले की, वंचित, शोषित, दलित, महिला, युवक, शेतकरी अशा प्रत्येक कमजोर वर्गाची लढाई समाजवादी पक्ष आणि सुहेलदेव भारतीय समाजवादी पक्ष मिळून लढणार आहे. ट्विटमध्ये अखिलेश यादव यांनी सुहेलदेव भारतीय समाजचे अध्यक्ष ओम प्रकाश राजभर (Om prakash Rajbhar) यांच्यासोबत एक फोटो देखील पोस्ट केला आहे.

समाजवादी पक्षाने आपल्या ट्विटमध्ये शेवटी एक घोषणा देखील लिहिली आहे. ट्विटमध्ये लिहिले आहे की, सपा और सुभासपा आए साथ, यूपी में भाजपा साफ!

भाजपला धक्का?

सुहेलदेव भारतीय समाजवादी पक्ष आणि समाजवादी पक्षाची युती ही भाजपला मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. कारण उत्तरप्रदेशमधील जवळपास ४ टक्के आणि पूर्वांचलमध्ये १८ ते २० टक्क्यांच्या आसपास राजभर यांना मानणारा मतदार वर्ग आहे. तर पूर्वांचलच्या तब्बल १०० पेक्षा जास्त जागांच्या निकालावर राजभर प्रभाव पाडू शकतात. ओम प्रकाश राजभर हे २०१७ च्या निवडणूकीत भाजपसोबत युती करत निवडणूकीच्या मैदानात उतरले होते. त्यावेळी त्यांनी लढवलेल्या ८ पैकी ४ जागांवर त्यांना विजय मिळवता आला होता. त्यानंतर ते योगी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते.

Akhilesh yadav and Om prakash Rajbhar
अखिलेश यादव आणि मायावती यांच्यामुळेच मोदी पंतप्रधान!

मात्र कालांतराने भाजपसोबत मतभेद झाल्यामुळे त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि आपल्या सुहेलदेव भारतीय समाज पक्षाला एनडीएपासून लांब केले होते. त्यावेळी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलताना त्यांनी यानंतर भाजपसोबत कधीच युती करणार नसल्याचे वचन दिले होते. सोबतच भाजपच्या पराभावाची घोषणा केली होती. त्यानंतर आता राजभर यांनी समाजवादी पक्षासोबत युतीची घोषणा केली आहे. मात्र यावेळी त्यांनी केलेली आणखी एक घोषणा चांगलीच चर्चा आली होती. राजभर म्हणाले होते की, समाजवादी पक्षाने आपल्याला एक जरी जागा दिली नाही तरी मी अखिलेश यादव यांच्यासोबतच राहणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com