चंद्राबाबू ढसाढसा रडले अन् जगनमोहन रेड्डी म्हणाले, सगळ्या राज्याला माहितीय!
Chandrababu Naidu and Jagan Reddy Andhra PradeshSarkarnama

चंद्राबाबू ढसाढसा रडले अन् जगनमोहन रेड्डी म्हणाले, सगळ्या राज्याला माहितीय!

पुन्हा मुख्यमंत्री होईपर्यंत विधानसभेत पाऊल टाकणार नाही, अशी प्रतिज्ञा चंद्राबाबू नायडू यांनी केली आहे. यावर मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी उत्तर दिले आहे.

अमरावती (आंध्र प्रदेश) : तेलगू देसम पक्षाचे (TDP) अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) हे काल (ता.19) भावूक झाले होते. पत्रकार परिषद सुरू असतानाच ते ढसाढसा रडू लागले. विधानसभेत वायएसआर काँग्रेसच्या (YSR Congress) सदस्यांनी केलेल्या व्यक्तिगत टीकेमुळे व्यथित झालेल्या नायडूंना भावनांचा बांध आवरता आला नाही. दरम्यान, पुन्हा मुख्यमंत्री होईपर्यंत विधानसभेत पाऊल टाकणार नाही, अशी प्रतिज्ञाही त्यांनी केली आहे. यावर मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी (Jagan Mohan Reddy) यांनी उत्तर दिले आहे.

मुख्यमंत्री रेड्डी म्हणाले की, नायडू हे किती निराश झाले आहेत ते सगळ्या राज्याला माहिती आहे. जनतेने नायडूंना नाकारले आहे. त्यांच्याच मतदारसंघातील कूप्पम महापालिका ते हरले आहेत. विधान परिषदेतही टीडीपीचा पराभव झाला आहे. ते आता काय करीत आहेत, कसे वागत आहेत, हे त्यांना कळेनासे झाले आहे. या सर्व वादाची सुरवात टीडीपी आणि नायडू यांनी केली होती. अनावश्यक आणि संदर्भहीन बडबड केल्याने लोकांनी त्यावर प्रतिक्रिया दिली. यावर ते आता असे वागत आहेत.

विधानसभेत काल सत्ताधारी वायएसआर काँग्रेस आणि विरोधी पक्ष टीडीपीमध्ये जोरदार खडाजंगी झाली. कृषी क्षेत्रावरील चर्चेवेळी हे रणकंदन झाले. नायडू यांच्या पत्नीबाबत वायएसआर काँग्रेसच्या नेत्यांनी अपशब्द वापरले. नायडू हे बोलत असतानाच त्यांचा माईक बंद करण्यात आला. अखेर अपमान सहन न झाल्याने नायडूंनी मुख्यमंत्री होईपर्यंत विधानसभेत पुन्हा पाऊल न टाकण्याची प्रतिज्ञा केली.

Chandrababu Naidu and Jagan Reddy Andhra Pradesh
मोदींनी कायदे मागे घेतले अन् वद्रा म्हणाले, हा शेतकऱ्यांसह माझ्या पत्नीचा विजय!

यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना नायडूंना अश्रू अनावर झाले. ते म्हणाले की, आता सहन होत नाही. मागील अडीच वर्षे मी सगळे काही सहन करीत होतो परंतु, मी शांत होतो. आज त्यांनी माझ्या पत्नीलाच लक्ष्य केले. मी कायम सन्मानाने जगलो असून, सन्मानासाठी जगलो आहे. आता हे सहन करण्यापलिकडे गेले आहे.

Chandrababu Naidu and Jagan Reddy Andhra Pradesh
वरुण गांधींनी पंतप्रधान मोदींसह भाजप सरकारलाच पाडलं तोंडावर!

वायएसआर काँग्रेसने मात्र नायडू हे नाटक करीत असल्याची टीका केली आहे. याच आठवड्यात नायडू यांना त्यांच्या चित्तूर जिल्ह्यात मोठा धक्का बसला होता. जिल्ह्यातील कूप्पम महापालिकेत पहिल्यांदाच टीडीपीचा पराभव झाला आहे. वायएसआर काँग्रेसने 25 पैकी 19 वॉर्ड जिंकले होते. याचबरोबर राज्यात आधी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही नायडूंना मोठा फटका बसला होता.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in