Andhra Pradesh : चंद्राबाबू नायडू यांच्या सभेत पुन्हा चेंगराचेंगरी, तिघांचा मृत्यू,अनेक जखमी!

Andhra Paradesh : कुटुंबीयांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची मदत जाहीर केली होती.
Andhra Paradesh : Chandrababu Naidu
Andhra Paradesh : Chandrababu NaiduSarkarnama

आंध्र प्रदेशातील माजी मुख्यमंत्री आणि तेलगू देसम (TDP) पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) यांच्या आंध्र प्रदेशातील गुंटूर येथील जाहीर सभेत पुन्हा एकदा चेंगराचेंगरी झाली. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. यापूर्वी नायडू यांच्या नेल्लोर येथील जाहीर सभेत चेंगराचेंगरी होऊन आठ जणांना जीव गमवावा लागला होता.

माजी मुख्यमंत्री नायडू जाहीर सभेसाठी निघाल्यानंतर गुंटूरमध्ये चेंगराचेंगरी झाली. जखमींना जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. टीडीपीने रेशन किट वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यामध्ये मोठ्या संख्येने लोक जमा झाले होते.

Andhra Paradesh : Chandrababu Naidu
Andhara Paradesh : मोठी बातमी : चंद्राबाबू नायडू यांच्या सभेत चेंगराचेंगरी; सात जण ठार!

यापूर्वी, 28 डिसेंबर रोजी आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातील कंदुकूर येथे तेलुगू देसम पार्टी (टीडीपी) ने आयोजित केलेल्या कार्यक्रमात चेंगराचेंगरीत होऊन आठ जणांना आपला जीव गमवावा लागला होता. विरोधी पक्षनेते एन. चंद्राबाबू नायडू बुधवारी एका रोड शोला संबोधित करत असताना होते, त्या दरम्यान काही लोक कालव्यात पडले, त्यातील काही लोकांचा मृत्यू झाला तर आठ जण जखमी झाले होते.

प्राप्त माहितीनुसार, मोठ्या संख्येने लोक या ठिकाणी जमले होते. दरम्यान, काही लोकांमध्ये बाचाबाची होऊन चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली. नायडू यांनी या घटनेनंतर त्यांची बैठक रद्द केली होती. ज्यांना या घटनेत प्राण गमावावे लागले, त्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची मदत जाहीर केली होती.

Andhra Paradesh : Chandrababu Naidu
चंद्राबाबू रडले अन् बालकृष्ण, ज्युनिअर एनटीआर संतापले!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in