अन् मध्यप्रदेशच्या ऊर्जामंत्र्यांनी नितीन गडकरींसमोर थेट लोटांगणच घातले..|पहा व्हिडीओ

Madhya Pradesh Politics| मध्य प्रदेशचे ऊर्जामंत्री प्रद्मुम्न सिंह तोमर त्यांच्या वेगळ्या स्टाइलमुळे कायम चर्चेत असतात.
Madhya Pradesh Politics|
Madhya Pradesh Politics|

नवी दिल्ली : मध्य प्रदेशचे ऊर्जामंत्री प्रद्मुम्न सिंह तोमर त्यांच्या वेगळ्या स्टाइलमुळे कायम चर्चेत असतात. आताही ते त्यांच्या अशाच एका कारणामुळे चर्चेत आले आहेत. त्यांचा हा अंदाज पाहून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनाही हसू आवरलं नाही. ग्वाल्हेरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात गडकरी आणि मुख्यमंत्री शिवराज सिंह यांचे आभार मानण्यासाठी प्रद्मुम्न सिंह तोमर थेट मंचावरच नतमस्तक झाल्याने सभागृहात एकच हशा पिकला होता.

त्याचं काय झालं, ग्वाल्हेरमध्ये राज्य सरकारने अकराशे कोटींहून अधिक रुपयांच्या विकासकामांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हेदेखील कार्यक्रमात उपस्थित होते. या कार्यक्रमात मंत्री नितीन गडकरी यांनी मोठमोठ्या घोषणा केल्या. या घोषणांनी भारावून गेलेल्या प्रद्मुम्न सिंह तोमर यांनी थेट व्यासपीठावर बसलेल्या गडकरी आणि चौहान यांच्यासमोर कृतज्ञता व्यक्त करत डोकं जमिनीवर टेकवून नमस्कार केला. हे दृश्य पाहून गडकरींसह व्यासपीठावर बसलेल्या सर्वांना हसू फुटले. त्यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Madhya Pradesh Politics|
Manikrao Gavit : माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री माणिकराव गावित यांचे निधन

या कार्यक्रमात मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते, 222 किलोमीटर लांबीच्या प्रमुख रस्त्यांची पायाभरणी आणि 829 कोटी रुपयांच्या उड्डाणपुलाच्या रस्त्यांचे भूमिपूजनही करण्यात आले. याशिवाय ग्वाल्हेर-चंबळ झोनला 1128 कोटींच्या सात रस्तेनिर्मितीची घोषणाही त्यांनी केली. ग्वाल्हेरच्या स्वर्णरेखा नदीवर एलिव्हेटेड रोडही तयार केला जाणार आहे.

हा मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचा ड्रीम प्रोजेक्ट असल्याचं मानलं जातं आहे. पहिल्या टप्प्याचे 447 कोटी रुपये खर्चून या रस्त्याच्या काम केले जाणार आहे. यापैकी 406 कोटी रुपये केंद्र सरकारकडून आणि 41 कोटी रुपये राज्य सरकारकडून मंजूर करण्यात आले आहेत. राज्यातील नदीवर बांधण्यात येणारा हा पहिलाच उड्डाणपूल असेल. ग्वाल्हेर आता विकासाच्या दिशेने धावत अशून लवकरच एलिव्हेटेड रोल्पा फेज वन आणि फेज दोनचे काम पूर्ण होईल. अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in