नुपूर शर्मांसाठी निवृत्त न्यायाधीशांसह अधिकारी मैदानात; सर्वोच्च न्यायालयावर ठेवलं बोट

नुपूर शर्मा यांच्या वक्तव्यानंतर देशभरात मोठा वाद निर्माण झाला आहे.
Supreme Court of India, Shivsena News, Eknath Shinde News
Supreme Court of India, Shivsena News, Eknath Shinde NewsSarkarnama

नवी दिल्ली : पैगंबर हजरत मोहम्मद यांच्याबदद्ल भाजपच्या (BJP) निलंबित नेत्या नूपुर शर्मा यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून सर्वोच्च न्यायालयाने त्यांना फटकारलं होतं. तुमच्यामुळे संपूर्ण देश पेटला असून उदयपूरमधील घटनाही तुमच्यामुळेच झाली, अशी टिप्पणी न्यायालयाने केली होती. त्यावरून आता देशातील निवृत्त न्यायाधीश, निवृत्त अधिकाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयाला खुलं पत्र लिहिलं आहे. (Nupur Sharma Latest News)

सर्वोच्च न्यायालयातील दोन न्यायाधीशांनी नुपूर शर्मा प्रकरणात केलेल्या टिप्पणीवर देशातील 15 निवृत्त न्यायाधीश, 77 निवृत्त अधिकारी आणि लष्करातील 25 निवृत्त अधिकाऱ्यांनी सरन्यायाधीशांना खुलं पत्र लिहिलं आहे. न्यायमूर्ती सुर्यकांत आणि न्यायमूर्ती जे. बी. पारदीवाला यांच्या टिप्पणीला या पत्रात दुर्भाग्यपूर्ण म्हटलं आहे. तसेच ही टिप्पणी न्यायिक लोकाचारानुसार नसल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे. याप्रकारच्या अपमानजनक भूमिकेला न्यायव्यवस्थेच्या इतिहासात कसलेही स्थान नाही.

Supreme Court of India, Shivsena News, Eknath Shinde News
चर्चांना उधाण; ठाकरे अडचणीत असताना वरुण सरदेसाई वीस दिवसांपासून कुठे आहेत?

नुपूर शर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयात केलेली याचिका आणि न्यायाधीशांच्या टिप्पणीचा कसलाही संबंध नव्हता. उलट त्यांना न्यायव्यवसेपर्यंत पोहचवण्यापासून रोखण्यात आलं. हे भारताच्या संविधानाची प्रस्ताव आणि भावनेचे उल्लंघन आहे. शर्मा यांच्या प्रकरणाकडे असं वेगळं का पाहिले जात आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या अशा भूमिकेची कोणीच प्रशंसा करू शकत नाही. ही टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाची पवित्रता आणि सम्मानाला प्रभावित करते, असंही पत्रात नमूद करण्यात आलं आहे.

एकूण 117 जणांची या पत्रावर सही असून त्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश क्षितिज व्यास, गुजरात उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश एस. एम. सोनी, राजस्थान उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश आर. एस. राठोड आणि प्रशांत अगरवाल, दिल्ली उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश एस. एन. ढिंगरा आदींचा समावेश आहे. तसेच महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक प्रविण दिक्षीत यांच्यासह अनेक निवृत्त अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

Supreme Court of India, Shivsena News, Eknath Shinde News
अजितदादांचा चंद्रकांत पाटलांविषयीचा अंदाज खरा ठरल्यास माधुरी मिसाळांना लॉटरी?

दरम्यान, नुपूर शर्मा यांच्या विरोधात महाराष्ट्रासह देशभरातील अनेक राज्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. हे सर्व गुन्हे दिल्लीत वर्ग करण्याची मागणी शर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) नुकतीच केली आहे. या याचिकेवर सुनावणीवेळी न्यायालयाने शर्मा यांनी फटकारत देशाची माफी मागण्यास सांगितले होते.

शर्मा यांच्या वक्तव्यामुळे देशात हिंसाचार झाला. उदयपूरमधील घटनाही त्यांच्यामुळे झाली. त्यामुळे त्यांनी टीव्हीवरून संपूर्ण देशाची माफी मागायला हवी, अशा शब्दांत न्यायालयाने शर्मा यांना फटकारलं होतं. तसेच गुन्ह्यांबाबत दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश दिले. उदयपूरमध्ये एका व्यक्तीने नुपूर शर्मा यांचं समर्थन केल्यामुळे दोघांनी नुकतीच निघृण हत्या केली आहे. (Nupur Sharma case news updates)

शर्मा यांच्या वकिलांनी न्यायालायत नुपूर शर्मा यांना जीवे मारण्याची धमकी आल्याचे सांगितले. त्यावर न्यायालयाने शर्मा यांच्यामुळे संपूर्ण देशात तणाव निर्माण झाल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्या एकट्याच या तणावाला कारणीभूत असल्याचेही न्यायालय म्हणाले. न्यालायाने दिल्ली पोलिसांवरही ताशेरे ओढले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com