Parliament Special Session : संसदेच्या विशेष अधिवेशनाआधी केंद्र सरकारने बोलावली सर्वपक्षीय बैठक : अजेंड्यावर चर्चा होण्याची शक्यता
New Delhi News : संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या एक दिवस आधी 17 सप्टेंबर रोजी केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. संसदेच्या विशेष अधिवेशनाचा अजेंडा सरकारने अद्याप जाहीर केलेला नाही. त्यामुळे सर्वपक्षीय बैठक महत्त्वाची मानली जात आहे. 18 ते 22 सप्टेंबरदरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन होणार आहे.
संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या अजेंड्याबाबत माहिती न दिल्याने काँग्रेसने (Congress) केंद्र सरकारवर जोरदार टीका केली होती. अधिवेशन सुरू व्हायला अवघे काही दिवस उरले आहेत. मात्र, कदाचित 'एक व्यक्ती' वगळता कुणालाही विशेष अधिवेशनाच्या अजेंड्याची माहिती नाही, असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला आहे. या अधिवेशनाबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.
18 सप्टेंबरपासून जुन्या इमारतीत संसदेचे विशेष अधिवेशन सुरू होत आहे. 19 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीला संसदेचे कामकाज नवीन इमारतीत हलवले जाण्याची शक्यता आहे. मात्र, विशेष अधिवेशन केंद्र सरकारने (Central Government) कशासाठी बोलावले आहे हे स्पष्ट केले नाही. त्यावरून काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले होते.
या पत्रामध्ये सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी अनेक मुद्दे उपस्थित करत महागाई, बेरोजगारी, तसेच मणिपूरमधील हिंसाचाराच्या मुद्द्यावर आणि गाैतम अदानी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी 'जेपीसी' समिती स्थापन करावी, अशी मागणी त्यांनी केली होती. आता सरकारने सर्व विरोधी पक्षांची बैठक बोलावली आहे. त्यामध्ये या विशेष अधिवेशनाबाबत चर्चा होऊ शकते.
Edited by : Amol Jaybhaye
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.