अमृता फडणवीसांनी ठाकरे सरकारला पुन्हा डिवचलं ; नेटकऱ्यांकडून हटके उत्तर

अमृता फडणवीस यांनी आज टि्वट करुन रिकाम्या जागा भरण्यास सांगितल्या आहेत.
अमृता फडणवीसांनी ठाकरे सरकारला पुन्हा डिवचलं ; नेटकऱ्यांकडून हटके उत्तर
Amruta Fadnavis, CM Uddhav ThackeraySarkarnama

मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी पुन्हा एकदा ट्विट करत महाविकास आघाडी सरकारवर (State Government) टीकास्त्र डागले आहे. अमृता फडणवीस नेहमीच ठाकरे सरकारवर निशाणा साधत असतात. आघाडी सरकारचं नाव न घेता त्यांनी यावेळी हटके पद्धतीने टीका केली आहे.

अमृता फडणवीस यांनी आज टि्वट करुन रिकाम्या जागा भरण्यास सांगितल्या आहेत. त्यांनी नेटकऱ्यांना विविध पर्याय दिले आहेत. अमृता फडणीस यांनी 'आज मी..' अशी टि्वटची सुरवात करीत पुढे जागा रिकामी ठेवली आहे. ही जागा भरण्यासाठी फडणवीस यांनी पर्याय दिले आहेत.

आता पावसाळ्यानिमित्ताने उद्भवणाऱ्या समस्यांवर फडणवीस यांनी हल्लाबोल केला आहे. त्यांनी आपल्या या ट्विटमध्ये ठाकरे सरकारचं नाव घेतलं नसलं तरीही त्यांनी त्यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. त्यांच्या या टि्वटमधील कॉमेन्ट बॉक्समध्ये (Comment Box) नेटकऱ्यांनी विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

अमृता फडणवीस यांनी दिले आहेत हे पर्याय?

  • CoronaPositive आढळले आहे.

  • एक दुःखद प्रेमगीत लिहित आहे.

  • पावसाळ्याआधी मुंबईच्या रस्त्यांवर आढावा घेण्याची योजना आखत आहे.

फडणवीसांना नेटकरी म्हणतात..

  • तुम्ही रस्त्यांचा आढावा घेण्यासाठी जात असाल असं अनेकांनी म्हटलं आहे.

  • अनेकांनी मिश्किलपणे म्हटलं आहे की तुम्ही सध्या काहीही करू नका फक्त देवेंद्र फडणवीसांची काळजी घ्या.

  • कृपया सध्या कोणतंही प्रेमगीत वगैरे लिहू नका.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in