Amritpal Singh : अमृतपाल सिंग याला अटक ? ; गाडी चालक, काकाचे आत्मसमर्थन

Amritpal Singhs Driver and Uncle Surrender Before Punjab Police : 18 मार्चपासून अमृतपाल सिंह आणि त्यांच्या समर्थकांवर कारवाई सुरू केली आहे.
 Amritpal Singh
Amritpal Singh

Amritpal Singhs Driver and Uncle Surrender Before Punjab Police : फरार खलिस्तानी समर्थक, खलिस्तानी गटांचा पोस्टरबॉय अमृतपाल सिंगला पंजाब पोलिस रविवारी दुसऱ्या दिवशीही पकडू शकले नसतानाची माहिती समोर येत असताना त्याला पंजाब पोलिसांनी अटक केल्याचा दावा 'वारिस पंजाब दे' संघटनेच्या वकिलाने केला आहे. पण पंजाब पोलिसांनी हे वृत्त फेटाळलं आहे.

मृतपाल सिंग (Amritpal Singh)च्या गाडीचा चालक आणि त्याचे काकाने पंजाब पोलिसांकडे आत्मसमर्थन केल्याचे वृत्त समोर येत आहे. चालक हरप्रीत आणि काका हरजीत सिंह यांनी मेहतपूर पोलिस ठाण्यात आत्मसमर्थन केले आहे. हरजीत सिंह हे अमृतपाल सिंह यांचे सल्लागार होते. शनिवारी हे दोघे त्याचे सोबत होते. पंजाब पोलिसांनी त्यांचा पाठलाग केल्याने हे दोघे अमृतपाल यांच्यापासून अप्लित झाले.

पंजाबमध्ये सलग तिसऱ्या दिवशी खलिस्तान समर्थक आणि 'वारीस पंजाब दे' संघटनेचा प्रमुख अमृतपाल याच्या अटकेसाठी पोलीस राज्यात मोहीम राबवत आहेत. अमृतपालचे पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयशी संबंध असल्याचा खुलासा पोलिसांनी केला आहे. अमृतपालने आनंदपूर खालसा फोर्स तयार करण्याची तयारी केली होती. त्याच्या घरातून आणि साथीदारांकडून जप्त केलेल्या शस्त्रांवर एकेएफ लिहिलेले पोलिसांना सापडले आहे.

'वारिस पंजाब दे' संघटनेचे वकील इमान सिंह खारा यांनी काल (रविवारी) दिलेल्या माहितीनुसार, मृतपाल सिंगला पंजाब पोलिसांनी अटक केली आहे. त्याला शाहकोट पोलीस ठाण्यात अटक केल्याचा दावा वकीलाने केला आहे.पंजाब पोलिसांची हे वृत्त खोटे असल्याचे सांगितले. अमृतपाल सिंग अजूनही फरार असून त्याला पकडण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरु असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

 Amritpal Singh
MPSC विद्यार्थ्यांनी यासाठी मानले शरद पवारांचे आभार..

अमृतपाल सिंगयाला ताब्यात घेण्यासाठी पंजाब पोलिसांनी मोहीम उघडली आहे. मात्र यावरून पंजाबमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. पंजाबच्या जालंधर आणि शाहकोट परिसरात पोलिसांनी कारवाई सुरू केली असून येथे जमावबंदीचा आदेशही देण्यात आला आहे.रविवारपासून (19 मार्च) पंजाब पोलिसांची अमृतपालला जलंधर परिसरात शोधण्याची मोहिम सुरूच आहे. पोलिसांनी शनिवारी म्हणजेच 18 मार्चपासून अमृतपाल सिंह आणि त्यांच्या समर्थकांवर कारवाई सुरू केली आहे.

 Amritpal Singh
Jairam Ramesh : राहुल गांधींच्या चौकशीवरुन जयराम रमेश पोलिसांवर भडकले..

अमृतपाल सिंगअद्याप फरार असून त्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा दावा पंजाब पोलिसांनी केला आहे. मात्र, पोलिसांच्या दाव्याच्या विरोधात वकील इमान सिंह खारा यांनी सांगितलं की, अमृतपाल सिंगला शाहकोट पोलीस ठाण्यात अटक करण्यात आली आहे. तसेच पोलीस त्याचं एन्काऊंटर करु शकतात, असाही वकीलाचा आरोप आहे.

आज (सोमवारी) दुपारी १२ वाजेपर्यंत पंजाबमध्ये एसएमएस व मोबाइल नेटबंदी वाढण्यात आली आहे. पोलिसांनी रविवारीदेखील अनेक शहरांत फ्लॅग मार्च केला. अमृतपालचे गाव जल्लूखेडा येथे मोठ्या प्रमाणात पोलिस दल तैनात करण्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com