अमित शहांनी अधिकाऱ्यांना पाठवले शरद पवारांकडे....

Sharad Pawar|Amit Shah : या भेटीची माहिती शरद पवार यांनी स्वत: फेसबुक पेजवरून दिली आहे.
NCP, MP Sharad Pawar Latest News
NCP, MP Sharad Pawar Latest News Sarkarnama

Sharad Pawar : सहकार मंत्रालयाच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाने मंगळवारी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार (Sharad Pawar) यांची नवी दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. या भेटीची माहिती शरद पवार यांनी स्वत: फेसबुक पेजवरून दिली आहे.

सहकार क्षेत्रातील अनुभव सांगण्याची आणि सहकार मंत्रालयाचे कामकाज प्रभावीपणे चालण्यासाठी आवश्‍यक त्या सूचना देण्याची विनंती मंत्रालयाच्या शिष्टमंडळाने पवार यांना यावेळी केली. अमित शहा (Amit Shah) यांच्याकडे केंद्रीय सहकार खाते आहे. सहकारमंत्री शहांच्या सूचनेनुसारच ही भेट झाली असल्याचा अंदाज आहे. (NCP, MP Sharad Pawar Latest News)

NCP, MP Sharad Pawar Latest News
बाळासाहेबांच्या शिवसेनेला काहीही धोका नाही मात्र उद्धव ठाकरेंच्या कोंडाळ्याला...

महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राशी पवार यांचा निकटचा संबंध आहे. सहकार मंत्रालयाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्‍वासन शरद पवार यांनी यावेळी शिष्टमंडळाला दिले. या शिष्टमंडळात ज्ञानेशकुमार, सहसचिव पंकज कुमार बन्सल, उपसंचालक श्रीमती सुचेता, मुख्य संचालक ललित गोयल यांचा समावेश होता. शरद पवार यांचा सहकार क्षेत्रातील अनुभवाचा फायदा मंत्रालयाच्या कामकाजात होण्यासाठी अधिकारी प्रयत्नशील असून त्याचाच एक भाग म्हणून कालची भेट असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, या भेटीचे सर्वस्तरातून स्वागत होत असून पवार यांच्या सल्ल्याचा आणि मार्गदर्शनाचा सहकार मंत्रालयाला निश्‍चित फायदा होईल, अशी प्रतिक्रिया उमटत असून फेसबुक पेजवर प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे.

पवारांच्या फेसबुक पेजवरील प्रतिक्रिया...

शेती आणि सहकार या क्षेत्राचं शरद पवार यांच्याइतकं सूक्ष्म निरीक्षण कोणाचंही नाही. शरद पवार यांचा सल्ला आणि मार्गदर्शन निश्चितच फलदायी ठरेल, असे जगदीश कदम यांनी प्रतिक्रिया दिली.

देशाच्या विकासात सहकार क्षेत्राचे महत्त्व आता केंद्र सरकारला कळून चुकले आहे. शरद पवार यांना सहकार क्षेत्राचा अनुभव आहे, असे सुनील शिंदे यांनी म्हटलं आहे.

अभिनंदन सर, सहकार क्षेत्राची भूमिका महत्वाची आहे. पण सध्या राजकारणात ढवळाढवळ वाढली आहे. कर्नाटकात के.एच. पाटील यांनी सहकार क्षेत्रात मोठे योगदान दिले आहेत. सहकारी साखर आणि डेअरी क्षेत्रात आपले योगदान खूप आहे असे रमेश लोहार म्हणाले. तर बिपिन पगार यांनी सहकार खात्याला योग्य न्याय मिळेल. शरद पवार यांच्या अनुभवातून या खात्याला योग्य मार्गदर्शन मिळेल, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in