India-China Clash : भारत आणि चीनमधील वादावर अमेरिकेनं केलं भारताचं समर्थन...

India-China Clash News : 'आपण साथीदार देशांच्या सुरक्षिततेसाठी कटिबद्ध'
Narendra Modi-Joe-Biden
Narendra Modi-Joe-BidenSarkarnama

India-China Clash News : अरुणाचलमध्ये एलएसी (LAC) जवळ तवांग येथे पुन्हा एकदा भारतीय आणि चीनच्या सैनिकांमध्ये चकमक झाली. या घटनेनंतर अमिरेकेने भारताला (India) साथ देत आपण साथीदार देशांच्या सुरक्षिततेसाठी कटिबद्ध आहोत, असं म्हटलं आहे. पेंटागॉनचे प्रेस सचिव पॅट रायडर याविषयी बोलताना म्हणाले की, ''चीन इंडो-पॅसिफीक भागात अमेरिकेचे साथीदार आणि भागिदार देशांना जाणून बुजून डिवचण्याचं काम करत आहे. आम्ही आमच्या मित्र देशांच्या सुरक्षिततेसाठी कटिबद्ध आहोत, असं त्यांनी नमूद केलं.

रायडर म्हणाले की, ''अमिरेकेचे संरक्षण विभाग प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (LAC) हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. आम्ही आमच्या मित्रपक्षांच्या सुरक्षिततेची खात्री करण्याच्या आमच्या वचनबद्धतेवर ठाम आहोत. भारताने तणाव कमी करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना आमचा पाठिंबा आहे'', असं म्हणत अमेरिकेने चीनच्या लष्करीकरणावर आणि एलएसीजवळील लष्करी पायाभूत सुविधांच्या बांधकामावरही टीका केली.

Narendra Modi-Joe-Biden
Pusad : चिकणीत बिनविरोधची परंपरा कायम, महिलांच्या हाती दिली धुरा...

भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी मंगळवारी सभागृहात सांगितले की, ''९ डिसेंबर रोजी अरुणाचल प्रदेशातील तवांग भागात चीनच्या सैन्याने एलएसीजवळ स्थिती बदलण्याचा प्रयत्न केला. परंतु आपल्या सैन्याने चिनी सैन्याचा निर्धाराने सामना केला. भारतीय सैनिकांनी त्यांचे मनसुबे उध्वस्त केले आणि चीनी सैनिकांना माघार घेण्यास भाग पाडले. यादरम्यान दोन्ही बाजूंनी चांगलीच चकमक झाल्याचे त्यांनी सांगितले. या चकमकीत एकही भारतीय जवान शहीद झाला नाही आणि काही सैनिक किरकोळ जखमी झाल्याचे संरक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले.

Narendra Modi-Joe-Biden
Shivsena : बोरनारेंना टक्कर देण्यासाठी ठाकरेंची खेळी ; चिकटगांवकरांच्या प्रवेशाने चित्र बदलणार..

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या व्हाईट हाऊसच्या प्रेस सचीव करीन जीन-पियरे यांनी सांगितले की, ''अमेरिका (America) एलएसीवरील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. अरुणाचलमधील सीमेवर झालेल्या चकमकीबाबत प्रतिक्रिया देताना अमेरिकेने म्हटले आहे की, दोन्ही देशांच्या सैन्याने वेळीच माघार घेतली ही आनंदाची बाब आहे''.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com