रशियाचे हल्ले थांबता थांबेनात; अमेरिका आता थेट मैदानात, युक्रेनला करणार मोठी मदत

रशियाकडून युक्रेनवर जोरदार हल्ले सुरूच असून राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन माघार घेण्यास तयार नाहीत.
Joe Biden
Joe BidenSarkarnama

वॉशिंग्टन : रशियाकडून (Russia) युक्रेनवर जोरदार हल्ले सुरूच असून राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) माघार घेण्यास तयार नाहीत. अमेरिकेसह (America) जगभरातील अनेक देश युक्रेनच्या बाजूने उभे राहिले आहेत. पण कोणत्याही देशात थेट युध्दात भाग घेतलेला नाही. मात्र, या देशांनी रशियावर अनेक निर्बंध लादले आहेत. आता युक्रेनच्या थेट मदतीसाठी अमेरिका सरसावली आहे. (Russia Ukraine War)

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांनी अमेरिकन संसदेतमध्ये युक्रेनसाठी 80 कोटी अमेरिकन डॉलरच्या अतिरिक्त सुरक्षाविषयक मदतीची घोषणा केली आहे. युक्रेनला आर्थिक मदतीबरोबरच शस्त्रास्त्रही पुरवली जाणार आहेत. या मदतीमध्ये 800 अॅन्टी एअरक्राफ्ट सिस्टीम, नऊ हजार अॅन्टी आर्मर सिस्टीम, सात हजार छोटी शस्त्र ज्यामध्ये ग्रेनेड लाँचर, बंदुकांचा समावेश असेल. त्याचप्रमाणे युक्रेनला ड्रोनही पुरवली जाणार असल्याची माहिती बायडेन यांनी दिली.

Joe Biden
मलिकांच्या जामीनासाठी मुलाकडे मागितले तीन कोटी रुपये!

अमेरिकेच्या या मदतीवर रशियाकडून अद्याप प्रतिक्रिया आलेली नाही. पण थेट शस्त्रास्त्र पुरवली जाणार असल्याने रशिया आणि अमेरिकेतील संबंध अधिक बिघडण्याची चिन्हं आहेत. त्यामुळे जगावरही युध्दात संकट ओढावू शकतं, अशी भीती व्यक्त केली जात आहे. बायडेन यांच्याकडून सातत्याने रशियावर टीका केली जात आहे. व्लादिमीर पुतीन यांना थेट आव्हान दिले जात आहे.

भारताला सूचक इशारा

भारताने (India) रशियाकडून कमी दरात कच्चा तेलाची खरेदी करण्यावरून अमेरिकेकडून (America) सूचक इशारा देण्यात आला आहे. भारताने कोणत्याही प्रतिबंधांचं उल्लंघन केलेलं नसलं तरी इतिहासात या घटनेची नोंद चुकीच्या बाजूने होईल, असंही अमेरिकेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. रशियाकडून कमी किंमतीत कच्चे तेल खरेदी करण्याची ऑफर भारताला दिली आहे.

याबाबत व्हाईट हाऊसच्या माध्यम सचिव जेन साकी यांनी मंगळवारी स्पष्ट केलं की, आम्ही घातलेल्या निर्बंधांचे पालन प्रत्येक देशांने करायला हवेत. भारताने कमी दरात कच्चा तेलाची खरेदी करण्याची रशियाची ऑफर निर्बंधांचे उल्लंघन करत नाही, असं साकी यांनी स्पष्ट केलं. साकी यांनी भारताच्या भूमिकेला थेट विरोध केला नसला तरी त्यांनी तसे सूचक संकेत दिले आहेत. भारताचा हा निर्णय इतिहासाच्या चुकीच्या बाजूला ढकलेल, असं त्या म्हणाल्या. या घटनांबाबत इतिहासाची पुस्तकं लिहिली जातील, त्यावेळी तुम्ही कुठे असावे, याचा विचार करावा. रशियाच्या नेतृत्वाला सहकार्य म्हणजे हल्ल्याचे समर्थन. ज्याचे विनाशकारी परिणाम होत आहेत, असं साकी यांनी म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in