सिद्धूंना मंत्री करण्यासाठी पाकच्या पंतप्रधानांचा फोन : अमरिंदरसिंग यांचा खळबळजनक आरोप

पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी (Panjab Assembly Election) भाजपने (BJP) आपल्या आघाडीच्या जागावाटप जाहीर केल्या आहे.
 navjot singh sidhu & amarinder singh
navjot singh sidhu & amarinder singh Sarkarnama

नवी दिल्ली : पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने (BJP) आपल्या आघाडीच्या जागावाटप आज (ता.24 जानेवारी) जाहीर केले. त्यानुसार भाजप ६५ जागांवर निवडणूक लढणार असून माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग (amarinder singh) यांच्या पंजाब लोक काँग्रेसला 3७ व अकाली नेते सुखेदवसिंग ढींढसा यांच्या संयुक्त अकाली दलाला (ढिंढसा) १५ जागा देण्यात आल्या आहेत. दरम्यान, आपल्या मंत्रिमंडळात नवज्योतसिंग सिद्धू (navjot singh sidhu) यांना घ्यावे यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान (Imran Khan) यांनीच खुद्द आपल्याकडे शिफारस पाठवली होती. अमरिदरसिंग यांच्या या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. सिद्धू यांना थेट पाकचा हस्तक ठरविण्याचा हा दावा प्रथमच उघडपणे करण्यात आला आहे.

 navjot singh sidhu & amarinder singh
'दिल्लीच्या साथीने सेना संपविण्याचे फडणविसांचे राजकारण`

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी पंजाबातील भाजप आघाडीचे जागावाटप निश्चित केले व अमरिंदरसिंग यांच्या उपस्थितीत त्याची घोषणा करण्यात आली. भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा, पंजाब प्रभारी गजेंद्रसिंह शेखावत आदी यावेळी उपस्थित होते. पंजाबमध्ये अमरिंदरसिंग यांनी काँग्रेसमधून बाहेर पडल्यावर स्वतःचा नवा पक्ष काढून भाजपशी युती केली. त्यामुळे शेतकरी आंदोलनामुळे भाजपच्या विरोधात तयार झालेला क्षोभ कमी होईल, अशी आशा भाजप नेतृत्वाला आहे. तरीही जागावाटपात भाजपचाच वरचष्मा राहील याची पूर्ण दक्षता शहा यांनी घेतल्याचे दिसते.

पंजाबची निवडणूक राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावरच लढण्याची रणनीती भाजपने आखली आहे. सिद्धू यांच्या पाकिस्तान प्रेमाचा मुद्दा बनवून अमरिंदर यांच्या मदतीने देशप्रेमाची लाट निर्माण करण्याचे भजपचे मनसुबे स्पष्ट आहेत. सिद्धू फॅक्टरचा काँग्रेसला जोरदार फटका बसेल, असा दावा भाजप नेते करतात.

 navjot singh sidhu & amarinder singh
फडणवीसांनी मोठी ऑफर देऊनही मी पक्ष सोडला! बड्या नेत्याचा गौप्यस्फोट

तिकीट वाटपावेळी नड्डा म्हणाले, पंजाबसारख्या सीमावर्ती व संवेदनशील राज्यात मजबूत व स्थिर सरकार असणे ही काळाची गरज असून भाजप-अमरिंदर युतीचे सरकारच ती पूर्ण करू शकते यावर पंजापची जनता मोहोर उमटवेल. अंमली पदार्थ व हत्यारांची तस्करी पाकिस्तान पंजाबच्याच मार्गाने करत आहे. पाकिस्तानची कारस्थाने कशी सुरू आहेत व या राज्यातील काही-प्रतिष्ठित नेत्यांच्या करवी तो देश भारताच्या एकतेला सुरूंग लावण्याचे उद्योग करत आहे. पंजाबात माफियाराज बोकाळले आहे. या सर्वांच्या झळा पंजाबलाच जास्त पोचत असल्याने या राज्याचे देशभक्त नागरिक भाजप आघाडीच्या मागे उभे राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अमरिंदरसिंग यांनी नड्डांच्या पुढे पाऊल टाकत सिद्धू यांच्यावर गंभीर आरोप केले. ते म्हणाले, पाकच्या पंतप्रधानांनी एका दूताकरवी माझ्याकडे सिद्धूंची थेट शिफारस केली होती. सिध्दूंना मंत्रिमंडळात घेतलेत तर मी तुमचा आभारी राहीन कारण ते माझे जुने मित्र आहेत. त्यांनी काम केले नाही तर, तुम्ही त्यांना हटवू शकता असेही त्यांनी त्या संदेशात म्हटले होते. मात्र, आपण त्यांचा परस्ताव फेटाळळा व २८ जुलैला सिद्धू यांची हकालपट्टीही केली. सिद्धू हा काही कामाचा माणूस नाही. ७० दिवस त्यांनी एकाही फाईलवर सही केलेली नव्हती. अत्यंत अयोग्य व्यक्ती आहे. त्यांना काम करणे जमत नाही, अशी टीका त्यांनी केली.

 navjot singh sidhu & amarinder singh
आजोबांना कोरोनाचा संसर्ग होताच नातू रोहित पवार यांची भावनिक पोस्ट

अमरिंदर म्हणाले, देशाची सुरक्षा व स्थिरता यासाठी मी व भाजप एकत्र आलो आहोत. पंजाबमध्ये शत्रू देशातून तब्बल १००० रायफल्स, ५०० पिस्तुले व आरडीएस ड्रोन पाठविले गेले. पंजाब पोलिस व सीमा सुरक्षा दलाने याची चौकशी केली. याबाबत माहिती मिळाली की, ही सारी हत्यारे एका निश्चित ठिकाणी पोचविण्यासाठी पाठविली गेली होती. येथे मात्र, अमरिंदर यांनी सिद्धू व इमरान खान यांचा थेट नामोल्लेख करण्याचे टाळले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com