लालू दिल्लीला रवाना ; विरोधक म्हणतात, 'साइबेरियन पक्षी'

जनता दल जदयूचे राष्ट्रीय अध्यक्ष ललन सिंह (lalan singh) यांनी लालू प्रसाद यादव (Lalu Yadav) यांच्यावर टीका केली आहे.
Lalu Yadav, lalan singh
Lalu Yadav, lalan singhsarkarnama

नवी दिल्ली : बिहार पोटनिवडणुकीनंतर राजदचे सुप्रीमो लालू प्रसाद यादव (Lalu Yadav) यांनी आपल्या परिवारासह दिल्ली गाठली आहे. पत्नी राबडी देवी, मुलगा तेजस्वी यादव (Tejaswi Yadav) आणि मिसा भारती यांच्यासहत ते दिल्ली गेले आहेत. लालूंचे दिल्लीला जाणे हा राजकीय मुद्दा करुन विरोधकांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. जनता दल जदयूचे राष्ट्रीय अध्यक्ष ललन सिंह (lalan singh) यांनी लालू प्रसाद यादव (Lalu Yadav) यांच्यावर टीका केली आहे.

ललन सिंह म्हणाले, ''लालू दिल्लीला गेले यात नवल वाटण्याचे काही कारण नाही. लालू कुटुंबिय बिहारमध्ये कुठे राहते. लालू कुटुंब अनिवासी बिहारी आहेत. लालू प्रसाद यादव आणि तेजस्वी यादव यांने बिहार व बिहारच्या जनतेविषयी प्रेम नसून त्यांना फक्त सत्तेची लालसा आहे. बिहारमध्ये महापूर, कोरोनाच्या संकटाच्यावेळी हे कुटुंबिय दिल्लीत होत. आता निवडणुकीच्या निमित्ताने ते बिहारमध्ये आले होते. आता दिवाळी आणि छट पूजा ते दिल्लीत साजरी करतील.''

ललनसिंह यांनी लालू प्रसाद यांची तुलना साइबेरियन पक्षासोबत केली आहे. ललनसिंह म्हणाले की, थंडीच्या दिवसात साइबेरियन पक्षी ज्याप्रमाणे भारतात येतात अन् थंडी संपल्यानंतर परत जातात तसेच लालू प्रसाद यादव यांचे कुटुंबाचेही आहे. ते बिहारमध्ये निवडणुकी आल्या की येतात अन् निवडणुकीत पराभव झाला की परत दिल्लीला जातात.

''लालू प्रसाद यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यात खूप फरक आहे. लालूंना फक्त आपल्या घराची चिंता आहे, तर नितीश कुमार यांना साऱ्या बिहारची चिंता आहे. बिहारच्या विकासासाठी नितीशकुमार हे दिवसरात्र काम करीत असतात. बिहारच्या जनतेचा या सगळ्याची कल्पना आहे,'' असे ललनसिंह यांनी सांगितले.

Lalu Yadav, lalan singh
ईडी, एनसीबीच्या अधिकाऱ्यांना 'कमळ' चिन्हावर उभे करा ; शिवसेनेचा चिमटा

बिहारचा बजेट २ लाख १८ हजार कोटी असेल असे कधी लालूंनात स्वप्नातही वाटले नसेल. नितीश कुमार सत्तेत आल्यावर हे शक्य झाले. स्वार्थ साधणे हा एकमेव उद्देश लालू कुटुंबियांचा आहे. सामाजिक कामासाठी पिता-पुत्र दोन्हींनाही बिहारमध्ये राहायला आवडत नाही. त्यामुळे बिहारच्या जनतेनं त्यांच्याविरोधात कैाल दिला आहे, असा टोमणा ललनसिंह यांना लगावला आहे.

`या`साठी आज फडणवीसांसह भाजपच्या नेत्यांचे राज्यभर भजन, आरतीचे कार्यक्रम!

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या हस्ते पाडव्याच्या मुहूर्तावर आज केदारनाथ येथे आद्य शंकराचार्यांच्या समाधी व मूर्तीचे अनावरण होणार आहे. यानिमित्ताने भाजपातर्फे देशभर ८२ तीर्थक्षेत्री कार्यक्रम होणार आहेत. त्यासाठी राज्यातील नऊ तीर्थस्थळी राज्यातील भाजपचे नेते देवदर्शन व कार्यक्रम करणार आहेत.पंतप्रधानांच्या हस्ते केदारनाथ धाम येथे झालेल्या २०० कोटींच्या विकासकामांचे उद्घाटन तसेच २०० कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन होणार आहे. या निमित्ताने आद्य शंकराचार्यांनी ज्या तीर्थक्षेत्रांना व १२ ज्योतिर्लिंग अशा देशातील ८२ तीर्थक्षेत्री भाजपतर्फे कार्यक्रम होणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com