Bharat Jodo Yatra | Rahul Gandhi
Bharat Jodo Yatra | Rahul Gandhi Sarkarnama

Bharat Jodo Yatra : भाजप-संघासोबतच काही मीडियाकडूनही द्वेष पसरवण्याचं काम; राहुल गांधीचा हल्लाबोल!

Bharat Jodo Yatra : चांदणी चौकाकडे बोट दाखवून राहुल गांधी म्हणाले, “येथे मंदिर, मशीद आणि गुरुद्वारा आहे. हेच हिंदुस्थान आहे."

Bharat Jodo Yatra : लोकांचे खिसे कापता यावेत यासाठीच सत्ताधारी पक्ष देशात द्वेष पसरवून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवत असल्याचा आरोप काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी शनिवारी केला. अप्रत्यक्षपणे देशातील मोठ्या उद्योगपतींकडे रोख ठेवत देत, राहुल गांधी म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदीवर कोणाचे नियंत्रण राहिलेले नाही, आणि त्यांना देशातील परिस्थिती हाताळता येत नाही."

'भारत जोडो यात्रेच्या सभेदरम्यान राहुल गांधी लाल किल्ल्यावरून म्हणाले, "या यात्रेचे ध्येय भारताला एकसंध करणे आहे." जेव्हा आपण हा प्रवास सुरू केला तेव्हा, मी विचार करत होतो की द्वेष नष्ट करण्याची गरज आहे. या देशात सर्वत्र द्वेष पसरला आहे, हे माझ्या मनात होते. पण जेव्हा मी चालायला सुरुवात केली, तेव्हा सत्य पूर्णपणे वेगळं होतं. मीडियाचा एक मोठा भाग द्वेष पसरवत आहे.

Bharat Jodo Yatra | Rahul Gandhi
Jaykumar Gore Accident : गंभीर अपघातनंतरही गोरेंनी सहकाऱ्यांना सावरले अन् पहिला फोन या नेत्याला...

ते म्हणाले, “या प्रवासात मला लाखो लोक भेटले. प्रत्येकजण एकमेकांवर प्रेम करतो, द्वेष करत नाही. देशातील ९० टक्के लोक एकमेकांचा द्वेष करत नाहीत.” चांदणी चौकाकडे बोट दाखवत राहुल गांधी म्हणाले, “येथे मंदिर, मशीद आणि गुरुद्वारा देखील आहे. हेच हिंदुस्थान आहे." द्वेष पसरवून लक्ष वळवले जात आहे आणि विमानतळ, बंदरे, रस्ते आणि देशाची संपत्ती "पंतप्रधानांच्या मालकांच्या" हाती सोपवली जात असल्याचा दावा त्यांनी केला.

ते म्हणाले, “जेव्हा कोणी खिसा कापतो, तेव्हा तो प्रथम पाहतो की ज्या व्यक्तीचे खिशा कापायचा आहे, त्याचे लक्ष दुसरीकडे वळवलं पाहिजे. लक्ष दुसरीकडे वळवून देशाचा खिसा कापला जात असल्याचे, घणाघाती टीका गांधींनी केली.

Bharat Jodo Yatra | Rahul Gandhi
भुमरेंचे टेन्शन वाढणार : आदित्य ठाकरेंचा दौरा फलदायी ठरला; दोन मोठी गावे शिवसेनेने हिसकावली!

नोटाबंदी आणि 'चुकीच्या पद्धतीने आणलेली जीएसटी' हे धोरणात्मक निर्णय नसून, यातून शेतकरी आणि छोट्या व्यापाऱ्यांना संपविण्याचे हत्यार असल्याचे राहुल गांधी म्हणाले. ते म्हणाले, “पंतप्रधानांनी त्यांच्या मालकांसाठी, छोट्या व्यावसायिकांचे कंबरडे मोडले. ”गरीबांना चिरडले पाहिजे, दुर्बलांना मारले पाहिजे, असे हिंदू धर्मात कुठे लिहिले आहे, हिंदू धर्मात मिठी मारण्याची उल्लेख आहे, असे राहुल गांधी म्हणाले.

“मला पत्रकाराने विचारले की तुला थंडी का वाटत नाही. हे लोक हाच प्रश्न देशातील शेतकरी आणि गरिबांना का विचारत नाहीत?... 2800 किलोमीटरची पदयात्रा करून आम्ही कोणतीही मोठी चर्चा केली नाही. शेतकरी, मजूर रोज चालतातच.” सीमेवर चीनसोबतच्या तणावावरूनही राहुल गांधींनी पंतप्रधानांवर निशाणा साधला. ते म्हणाले, “चीनने आमची दोन हजार चौरस किलोमीटर जमीन बळकावली. पंतप्रधान म्हणतात की, आत देशात कोणी आले नाही. जर कोणी आले नाही तर आमचे सैन्य त्यांच्या सैन्याशी लढा देईल? मात्र परिस्थिती वेगळी आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com