माजी मंत्र्याच्या शेतात सापडला दलित मुलीचा मृतदेह; मुलाला अटक

मृतावस्थेत आढळून आलेली मुलगी मागील दोन महिन्यांपासून गायब होती. तिच्या आईने याबाबत 8 डिसेंबर रोजी पोलीसांतही तक्रार दिली होती.
Unnao Murder Case
Unnao Murder CaseSarkarnama

उन्नाव : उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) 2017 मध्ये बलात्कार प्रकरणाने उन्नाव (Unnao) हे प्रकाशझोतात आले होते. भाजपच्या (BJP) तत्कालीन आमदारावर आरोप झाल्यानंतर राजकारण तापलं होतं. आता विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) रणधुमाळीतच पुन्हा एकदा उन्नावमध्ये दलित मुलीच्या हत्याकांडाचा प्रकार समोर आला आहे. एका माजी मंत्र्याच्या शेतात गुरूवारी दलित मुलीचा मृतदेह आढळून आला आहे. हा मृतदेह पुरण्यात आला होता. त्यामुळे उत्तर प्रदेशात खळबळ उडाली आहे.

मृतावस्थेत आढळून आलेली मुलगी मागील दोन महिन्यांपासून गायब होती. तिच्या आईने याबाबत 8 डिसेंबर रोजी पोलीसांतही तक्रार दिली होती. त्यांनी माजी राज्यमंत्री व समाजवादी पक्षाचे (Samajwadi Party) दिवंगत नेते फतेहबहादुर यांचा मुलगा राजू सिंह याच्यावर अपहरणाचे आरोप केले होते. त्यांनी अनेक पोलीस ठाण्यात खेटे घातले. तसेच 24 जानेवारी रोजी लखनौमध्ये मुलीच्या आईने समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांच्या गाडीसमोरच उडी घेतली होती.

Unnao Murder Case
यूपी, उत्तराखंडबाबत शिवराजसिंहांचं मोठं विधान अन् काँग्रेसला फुटल्या उकळ्या

त्यानंतर या प्रकरणाची चर्चा वाढू लागल्यानंतर पोलीसांनी 25 जानेवारी रोजी राजू सिंह याला अटक केली. पण मुलीचा शोध लागला नव्हता. अखेर पोलिसांनी केलेल्या तपासात सिंह याच्या शेतातच मुलीचा मृतदेह पुरल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शेतात खोदकाम सुरू केलं होतं. चार फुटांचा खड्डा खोदल्यानंतर मुलीचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर मुलीच्या आईने पोलिसांवर आरोप केले आहेत.

मुलीचे वडील म्हणाले, आमच्या मुलीचा मृतदेह दिव्यानंतर आश्रमातच आढळला होता. या आश्रमात मुलगी कैद होती. तेव्हा प्रेम नारायण दीक्षित ठाणे अंमलदार होते. त्यांच्याच मदतीने राजू सिंह याने मुलीचा खून केला, असा आरोपी मुलीच्या वडिलांनी केला आहे. आता या घटनेवरून उत्तर प्रदेशातील राजकारण चांगलंच तापलं आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजप व बसपाने समाजवादी पक्षावर टीकास्त्र सोडलं आहे.

Unnao Murder Case
जामीन मिळाला तरी मंत्रिपुत्र दोन गंभीर कलमांमध्ये अडकला अन्...

उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य (Keshav Prasad Maurya) यांनी या घटनेचा तपास करून दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असं म्हटलं आहे. तसेच मुलीची आई अखिलेश यांच्य गाडीसमोर रडत होती, पण तेव्हा त्यांचं ऐकलं नाही. सपा नेत्याला संरक्षण दिलं. या नेत्यांचा प्रत्येक अपराध माफ करणार का, असा सवाल त्यांनी केला आहे. बसपा अध्यक्ष मायावती (Mayawati) यांनी दोषींवर कडक कारवाईची मागणी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in