शरजीलचे भाषण चिथावणीखोर नव्हतेच; उच्च न्यायालयाचा सरकारला झटका

चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी शरजीलवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Sharjeel Imam
Sharjeel ImamSarkarnama

अलाहाबाद : चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी देशद्रोहाचा गुन्हा (Sedition Case) दाखल असलेला कार्यकर्ता शरजील इमाम (Sharjeel Imam) याला अलाहाबाद उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे. शरजीलचे भाषण चिथावणीखोर नव्हते तसेच त्याने हाती शस्त्र घेण्याचे आवाहनही केले नसल्याचे निरीक्षण न्यायालयाने जामीन देताना नोंदवलं आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश सरकारला (Uttar Pradesh) मोठा झटका बसला आहे.

शरजील इमाम याला न्यायालयाने देशद्रोहाच्या गुन्हयात 27 नोव्हेंबर रोजी जामीन मंजूर केला आहे. या जामीन आदेशाची प्रत समोर आली आहे. अलीगड मुस्लिम विद्यापीठामध्ये (AMU) 16 जानेवारी 2020 रोजी सीएए विरोधात आंदोलन करण्यात आले होते. यावेळी शरजील यांनी देशविरोधी भाषण केल्याच्या आरोपाखाली उत्तर प्रदेश सरकारने शरजीलवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sharjeel Imam
आंदोलनात एकाही शेतकऱ्याचा मृत्यू नाही! मदत देण्यास मोदी सरकारचा नकार

अलीगड येथील पोलीस ठाण्यात 25 जानेवारी 2020 रोजी हा गुन्हा दाखल जाला आहे. शरजीलच्या जामीनवर झालेल्या सुनावणीवेळी न्यायाधीश सौमित्र दयाळ यांनी काही महत्वाची निरीक्षणे नोंदवली आहेत. शरजील याच्या भाषणामुळे कोणतीही हिंसा झालेली नाही किंवा त्याने शस्त्रे हाती घेण्याचे कसलेही आवाहन केल्याचे दिसत नाही, असं सांगत न्यायालयाकडून जामीन मंजूर कऱण्यात आला.

सुनावणीवेळी शरजील यांच्या वकिलांनी न्यायालयात बाजू मांडली. शरजीवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात चुकीची कलमे लावण्यात आली आहेत. शरजील याने उपस्थितांना हिंसा करण्याबाबत किंवा शस्त्र हाती घेण्याबाबत भडकवलेले नाही. देशाच्या एकात्मतेला धोका पोहचेल, असं कोणतंही वक्तव्य केलेलं नाही. तसेच कोणत्याही समाजाविषयी एखादं कृत्य करण्यासही प्रवृत्त केलेलं नाही, असं वकिलांनी न्यायालयाला सांगितले.

Sharjeel Imam
मलिकांविरोधात भाजप आक्रमक; एकाच नेत्याकडून तीन खटले दाखल

शरजीलच्या जामीनाला सरकार पक्षाकडून जोरदार विरोध करण्यात आला. दरम्यान, शरजीलला या प्रकरणात जामीन मिळाला असला तरी त्याला तुरुंगातच राहावे लागणार आहे. दिल्लीत 2020 मध्ये झालेल्या दंगल प्रकरणात त्याच्यावर बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायदा (UAPA) दिल्लीत गुन्हा दाखल आहे. या प्रकरणातील जामीनासाठीही दिल्ली उच्च न्यायालयात अर्ज करण्यात आला आहे. न्यायालयाने दिल्ली पोलिसांनी आपले म्हणणे मांडण्यास सांगितले असून त्यावर 11 फेब्रुवारी रोजी पुढील सुनावणी होणार आहे. या प्रकरणात शरजीलला 28 जानेवारी 2020 रोजी बिहार येथून अटक करण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com