NCP : मोठी बातमी : राष्ट्रवादीचे राष्ट्रीय पातळीवरील विभाग, सेल बरखास्त

महाराष्ट्रात कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत.
Sharad Pawar Latest Marathi News
Sharad Pawar Latest Marathi NewsSarkarnama

नवी दिल्ली : राज्याच्या राजकारणात मागील काही दिवसांत मोठी उलथापालथ झाली आहे. महाविकास आघाडीची सत्ता जाऊन आता शिंदे सरकार आलं आहे. शिवसेनेत बंड केलेल्या आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर खापर फोडले आहे. या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीतही मोठ्या घडामोडी घडत आहेत. (NCP Latest Marathi News)

राष्ट्रवादी काँग्रेसने बुधवारी राष्ट्रीय पातळीवरील बहुतेक सर्व विभाग व सेल बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत पक्षाचे सरचिटणीस खासदार प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी याबाबतचे आदेश काढले आहे. पटेल यांनी ट्विटरवरून याबाबत माहिती दिली आहे.

Sharad Pawar Latest Marathi News
Rahul Kul : राहुल कुल यांनी 18 कोटी देण्याचे मान्य केले अन् रियाजभाई जाळ्यात अडकला!

पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे पटेल यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादी महिला काँग्रेस, राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस हे विभाग वगळून इतर सर्व राष्ट्रीय पातळीवरील विभाग बरखास्त करण्यात आल्याचं पटेल यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्र अथवा अन्य कोणत्याही राज्यातील कार्यकारिणी किंवा विभागांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असंही पटेल यांनी स्पष्ट केलं आहे. केवळ राष्ट्रीय पातळीवर ठराविक विभागांसाठीच हा निर्णय घेण्यात आला आहे. पक्ष पातळीवर अंतर्गत निवडणुका सुरू असल्याने संबंधित विभाग बरखास्त करण्यात आल्याचे समजते.

दरम्यान, राष्ट्रवादीकडून 2024 च्या सार्वजनिक निवडणुकांचीही जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. राज्यात विधानसभेच्या 100 जागांवर पक्षाने लक्ष केंद्रित केले आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसलाही कार्यक्रम दिला आहे. त्याचप्रमाणे सत्तेत असतानाही त्यांनी संबंधित मतदारसंघात ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यावर शिवसेनेतील आमदारांनी आक्षेप घेतला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in