BJP Politics : केंद्रातील सर्व संस्था आरएसएसच्या ताब्यात; राहुल गांधींचा आरोप

Rahul Gandhi| वाढत्या महागाईचे आकडे केंद्रीय अर्थमंत्र्यांना दिसत नाहीत
Rahul Gandhi|
Rahul Gandhi|

नवी दिल्ली : ''देशात लोकशाही उरलेली नाही. ७५ वर्षात जे कमावलं ते भाजपने आठ वर्षांत गमावलं, सरकारविरोधात कोणी बोललं तर त्याला तुरुंगात टाकलं जात. देशात, महागाई, बेरोजगारी सारखे प्रश्न उभे राहिले आहेत. पण केंद्रसरकारची हुकूमशाहीच सुरु आहे.'' असा आरोप कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला. दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोतही यावेळी उपस्थित होते.

आज देशभरात कॉंग्रेसकडून महागाई विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. अशात राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केंद्रसरकारवर सडकून टीका केली आहे. " देशातील विरोधक लोकशाहीत लढतात ते संविधानाच्या बळावर लढत असतात. पण आज देशातील कोणतीही संस्था स्वतंत्र नाही, देशातील सर्व संस्था, यंत्रणा आरएसएसच्या ताब्यात आहेत. केंद्रातील सर्व संस्थांमध्ये आरएसएसचे लोक बसवले गेले असल्याचा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी यावेळी केला.

Rahul Gandhi|
पृथ्वीराज चव्हाण म्हणतात, चुकीच्या घटनांचे घडय़ाळ आता उलट फिरवणार आहे का?

देशात महागाई वाढत आहे. बेरोजगारी वाढत आहे. तुम्ही कुठेही जाऊन विचारा, पण वेगळच काहीतरी दाखवलं जात आहेत. पण मी जितक खरं सागंणार तेवढा माझ्यावर अटॅक होणार. मी मुद्दे उपस्थित केले की माझ्यावर कारवाई होणार, पण या कारवायांना घाबरुन मी शांत बसणार नाही. आता विरोधक आक्रमकतेने उभे राहत आहेत. पण विरोधकांवर होणाऱ्या कारवायांमुळे त्यांची तीव्रता दिसून येत नाही.

केंद्र सरकार स्टार्टअप इंडियाबद्दल बोलते, पण कुठे आहे स्टार्टअप इंडिया. आज देशात महागाईचा स्फोट झाला आहे. पण वाढत्या महागाईचे आकडे केंद्रीय अर्थमंत्र्यांना दिसत नाहीत.बेरोजगारी वाढली आहे. पण भारत सरकार हे मानन्यास तयार नाही. कोरोना काळात गुजरातमध्ये लाखो लोकांचे मृत्यू झाले पण, भारत सरकार म्हणते हे सत्य नाही. युएसचे सरकार म्हणते तुमचं सरकार खोटं बोलते. संयुक्त राष्ट्रांना खोटं ठरवण्यापर्यंत मजल गेली, असा हल्लाबोल राहुल गांधी यांनी यावेळी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in