भाजपशी पंगा घेणं मित्रपक्षाला महागात; तीनही आमदार फोडत दिला दणका

बिहारमध्ये भाजपने मित्रपक्षालाच जोरदार झटका दिला आहे. विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपशी पंगा घेणं या पक्षाला महागात पडला आहे.
BJP
BJPSarkarnama

नवी दिल्ली : बिहारमध्ये भाजपने (BJP) मित्रपक्षालाच जोरदार झटका दिला आहे. विधानसभेच्या पोटनिवडणुकीत (Assembly Election) भाजपशी पंगा घेणं या पक्षाला महागात पडला आहे. भाजपने मित्रपक्षाचेही तीनही आमदार फोडत मोठा झटका दिला आहे. त्यातच या मित्रपक्षाच्या अध्यक्षांची विधान परिषदेच्या सदस्यत्वाची मुदतही काही दिवसांत संपत आहे. त्यामुळे या पक्षांच विधीमंडळातील अस्तित्वच संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. (Bihar Politics)

विकासशील इन्सान पक्षाने (VIP) भाजपला दणका दिला आहे. या पक्षाचे विधानसभेत तीन आमदार होते. आता हे तिघांनाही बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला. आमदार मिस्त्री लाल यादव, राजु सिंग आणि स्वर्ण सिंग अशी तिघांची नावे आहेत. त्यामुळे पक्षाचे अध्यक्ष मुकेश सहानी (Mukesh Sahani) यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत. भाजपसोबत हा पक्ष विधानसभा निवडणुकीवेळी एनडीएमध्ये सहभागी झाला आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्या सरकारमध्ये सहानी मंत्री आहेत.

BJP
मी सांगितलं म्हणून...! सचिन पायलट यांचा वैभव गेहलोतांविषयी गौप्यस्फोट

सहानी यांच्या पक्षाचे तीनही आमदार भाजपमध्ये गेले आहेत. त्यांची विधान परिषदेची मुदत काही दिवसांत संपत आहे. त्यांना पुन्हा विधान परिषदेत संधी देण्याबाबत भाजपचा नकार असल्याचे बोलले जात आहे. नितीश कुमार यांनीही हात झटकल्याचे समजते. त्यामुळे सहानी यांना पुन्हा विधीमंडळात येण्याची शक्यता धुसर असल्याने त्यांचं मंत्रिपद आणि विधीमंडळातील अस्तित्वही संपुष्टात येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

ही निवडणूक ठरली धोक्याची...

भाजप आणि सहानी यांच्यामध्ये वाद वाढण्याचे कारण विधानसभेची पोटनिवडणूक ठरली आहे. बिहारमधील बोचाहा मतदारसंघाची निवडणूक 12 एप्रिल रोजी होणार आहे. सहानी यांच्या पक्षाचे आमदार मुसाफिर पासवान यांच्या निधनामुळे हा जागा रिक्त आहे. या जागेवर भाजपने उमेदवार उभा केल्यानंतर सहानी यांनी नाराजी व्यक्त केली. नितीश कुमार यांच्या माध्यमातून सहानी यांनी भाजपने ही जागा सोडण्याची विनंती केल्याचे समजते. पण भाजप तयार न झाल्याने सहानी यांचा पक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरला आहे.

BJP
पाटणकर प्रकरणातील चतुर्वेदीनं ईडीला दमवलं; अनेकदा समन्स पाठवलं, यूपीतही शोधलं पण...

सहानी यांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीतही 49 उमेदवार उतरवले होते. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर ते प्रचारसभेत जोरदार टीका करत होते. तेव्हापासूनच बिहारमधील भाजप नेते नाराज होते. आता बिहार पोटनिवडणुकीने त्यात भरच पडली. त्यामुळे भाजपने तीनही आमदार फोडत सहानी यांना झटका दिला. या तीन आमदारांनी बुधवारी विधानसभा अध्यक्षांची भेट घेत स्वतंत्र गटाचे पत्र दिले. त्यानंतर त्यांचा भाजपला पाठिंब्याचा मार्ग सुकर झाला. हे तिघेही विधानसभा निवडणुकीपुर्वी भाजपमध्येच होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com