India Today Mood of the Nation : बिहारमध्ये भाजपसाठी धोक्याची घंटा ; INDIA ला होणार फायदा !

C Voter Survey : 2019 मध्ये जिंकलेल्या जागांबद्दल बोलायचे तर, एकट्या भाजपकडे 17 जागा आहेत. जेडीयूकडे 16, एलजेपीकडे सहा आणि काँग्रेसकडे एक जागा आहे.
India Today Mood of the Nation :
India Today Mood of the Nation : Sarkarnama

Bihar Loksabha Election : आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीतील जनतेचा कल जाणून घेण्यासाठी राज्याराज्यांत सर्व्हे होत आहेत. अशात बिहारमध्ये झालेल्या सर्व्हेमधून आश्चर्यकारक आकडेवारी समोर आली आहे. यातून भाजप आणि मित्रपक्षांना चांगलाच धक्का बसण्याची शक्यता आहे. बिहारमध्ये लोकसभेच्या 40 जागा आहेत. इंडिया टुडे सी व्होटरच्या सर्वेक्षणानुसार, याठिकाणी भाजपच्या निम्म्याहून अधिक जागा कमी झाल्या आहे. म्हणजेच याठिकाणी एनडीएला मोठा धक्का बसण्याची चिन्हे आहेत.

बिहारमध्ये 2019 च्या लोकसभेत 'एनडीए'ला 39 जागा मिळाल्या होत्या. पण यावेळी त्यांच्या जागा कमी होताना दिसत आहेत. त्यावेळी मुख्यमंत्री नितीश कुमार भाजपसोबत होते. पण काही महिन्यांपूर्वी नितीश कुमार यांनी भाजपसोडून राष्ट्रीय जनता दलासोबत हातमिळवणी करत पुन्हा सत्ता स्थापन केली.

India Today Mood of the Nation :
Rahul Gandhi For PM : 'इंडिया'चा पहिला बॅट्समॅन ठरला; राहुल गांधी असणार पंतप्रधानपदाचे उमेदवार ?

इंडिया टुडे सी-व्होटरमध्ये आलेल्या जागांच्या संख्येनुसार 'इंडिया' आघाडीला २६ जागा आणि 'एनडीए'च्या खात्यात १४ जागा जात आहेत. म्हणजेच, 2019 च्या तुलनेत यावेळी भाजपला कमी जागा मिळणार असल्याचे दिसत आहे.

नितीश आणि तेजस्वी यादव यांच्या जोडीला पसंती

विशेष म्हणजे, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राजदसोबत जाऊन सरकार स्थापन केले. बिहारमध्ये नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्या सरकारला एक वर्ष पूर्ण झाले. सर्वेक्षणानुसार या दोघांच्या जोडगोळीला नितीश आणि तेजस्वी यादव यांच्या कामाला जनतेने पसंती दिली आहे का, असेही प्रश्न उपस्थित होऊ लागले आहे. असे झाले तर भाजपला ते अवघड होऊन बसेल आणि मोठे नुकसान होईल.

India Today Mood of the Nation :
Nitin Desai News : आत्महत्येपूर्वी नितीन देसाईंची दिल्लीत भाजप नेत्यांना भेट की उद्धव ठाकरेंकडे मदत? आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी !

2019 मध्ये लोकसभेच्या जागांबद्दल बोलायचे झाले तर आता एकट्या भाजपकडे 17 जागा आहेत. जेडीयूकडे 16, 'एलजेपी'कडे सहा आणि काँग्रेसकडे एक जागा आहे. पण यावेळी नितीश कुमार भाजपसोबत नाहीत. त्यामुळे आगामी निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in