नुपूर शर्माचं वक्तव्य महागात पडणार; अल् -कायदा दहशतवादी संघटनेची भारताला धमकी

BJP| Nupur Sharma| अल-कायदा इन द सबकॉन्टीनंट (AQIS) या दहशतवादी संघटनेने गुजरात, उत्तर प्रदेश, मुंबई आणि दिल्लीमध्ये आत्मघाती हल्ले करण्याचा इशारा दिला आहे.
Terrorist Attack in India
Terrorist Attack in India

Terrorist Attack in India

नवी दिल्ली : भाजपच्या (BJP) प्रवक्त्या नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांनी प्रेषित मोहम्मद यांचा अवमान करणारं वक्तव्य अंगलट आलं आहे. जगभरातील इस्लामिक राष्ट्रांनी याचा विरोध दर्शवला. मात्र हे इतक्यावरच थांबले नाहीत. या प्रकरणावरुन आता थेट अल-कायदा या दहशतवादी संघटनेनं भारतामध्ये (India) आत्मघाती दहशतवादी (terrorist) हल्ले करण्याची धमकी दिली आहे.

अल-कायदा इन द सबकॉन्टीनंट (AQIS) या दहशतवादी संघटनेने गुजरात, उत्तर प्रदेश, मुंबई आणि दिल्लीमध्ये आत्मघाती हल्ले करण्याचा इशारा दिला आहे. संघटनेने जारी केलेल्या पत्रामध्ये ‘भगवे दहशतवादी’ असा उल्लेख करत भारतीयांनी दिल्ली, मुंबई, उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये होणाऱ्या आत्मघाती हल्ल्यासाठी तयार राहण्याचा इशारा दिला आहे. प्रेषित मोहम्मद यांच्या सन्मानासाठी आम्ही स्वत:लाही उडवून देऊ शकतो, असंही या दहशतवादी संघटनेने म्हटलं आहे.

Terrorist Attack in India
खडसेंच्या उमेदवारीने राष्ट्रवादी करणार गिरीश महाजनांची कोंडी?

इतकंंच नव्हे तर या, ‘भारतावर ताबा मिळवलेले हिंदू दहशतवादी’ असा उल्लेख करत दहशतवाद्यांनी भाजपवरही निशाणा साधला आहे. “आपल्या प्रेषितांचा अपमान करणाऱ्यांना ठार मारलं पाहिजे. त्यांना उडवून लावण्यासाठी आपल्या अंगावर स्फोटके बांधून हल्ला केला पाहिजे. प्रेषितांच्या अपमानासाठी त्यांना कोणतीही माफी मिळणार नाही. कोणतीही शांतता आणि सुरक्षा त्यांना वाचवू शकणार नाही. आत हे प्रकरण निंदा किंवा दुःखाच्या कोणत्याही शब्दांनी शांत होणारं नाही,” असंही या संघटनेने या पत्रात म्हटलं आहे.

या युद्धात प्राण गमावले तरी हरकत नाही, असं म्हणत प्रेषितांच्या सन्मानासाठी इतर संघटनांनाही या युद्धामध्ये सहभागी होण्याचं आवाहन या दहशतवादी संघटनेनं इतरांना केलं आहे. दरम्यान, नुपूर शर्मा यांच्या वक्तव्यानंतर त्यांची पक्षामधून हकालपट्टी करण्यात आली. पक्षाच्या धोरणांच्याविरोधात भूमिका घेतल्याचा आरोप करत नुपूर शर्मा यांना पक्षातून काढून टाकण्यात आलं.

मुंबई तसेच, ठाणे पोलीस ठाण्यासह पुणे व हैदराबाद शहरांमध्येही नूपुर शर्मा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी नूपुर यांना नोटीस बजावली असून २२ जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्याच्या आदेश दिले आहेत. तर नूपुर शर्मा यांच्याविरोधात अद्याप दिल्लीत कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही. उलट, नूपुर शर्मा यांनीच दिल्ली पोलिसांकडे धाव घेतली असून आपल्याला जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याची तक्रार देत पोलिस संरक्षणाची मागणी केली आहे. शर्मा यांच्या विनंतीनुसार, दिल्ली पोलिसांनी नूपुर शर्मांसह त्यांच्या कुटुंबीयांना सुरक्षाव्यवस्था दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com