२२ वर्षांनंतर अमेरिकेचा बदला पूर्ण : अल-कायदा प्रमुख अल-जवाहिरी ड्रोन हल्ल्यात ठार

Al-Qaeda Leader Ayman al-Zawahri | या बदल्यासाठी किती वेळ लागला, तो कुठे लपून बसला होता या चर्चांना महत्व राहत नाही
Al-Qaeda Leader Ayman al-Zawahri
Al-Qaeda Leader Ayman al-ZawahriSarkarnama

(Al-Qaeda Leader Ayman al-Zawahri Killed In US Drone Strike)

काबूल : अफगाणिस्तानमधील काबूल शहरात अल-कायदाचा प्रमुख अयमान अल-जवाहिरी याला अमेरिकेकडून ड्रोल हल्ल्यात ठार मारण्यात आले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी या वृत्ताची आज माध्यमांना माहिती दिली. या हल्ल्यानंतर अमेरिकेचा 9/11 हल्ल्याचा बदला पूर्ण झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. 11 सप्टेंबर 2001 रोजी या हल्ल्यात अमेरिकेसह 93 देशांतील तब्बल 2 हजार 977 लोकांचा मृत्यू झाला होता.

ड्रोनद्वारे दोन क्षेपणास्त्र डागण्यात आली तेव्हा जवाहिरी एका सुरक्षित घराच्या बाल्कनीत होता. त्यावेळी त्याच्यासोबत कुटुंबातील इतर सदस्यही उपस्थित होते. मात्र, या हल्ल्यात इतर सदस्यांना कोणतीही इजा झालेली नसून केवळ जवाहिरी मारला गेला आहे, अशी माहिती जो बायडन यांनी दिली आहे. यानंतर सर्व मृतांना न्याय मिळाला आहे आणि अमेरिकेचा बदला पूर्ण झाला आहे. या बदल्यासाठी किती वेळ लागला, तो कुठे लपून बसला होता या चर्चांना महत्व राहत नाही, आम्ही शोधून मारु असेही बायडन म्हणाले. (Al-Qaeda Leader Ayman al-Zawahri Killed In US Drone Strike)

अल-कायदा प्रमुख अयमान अल-जवाहिरी हा सुरुवातील इजिप्शियन सर्जन होता. मात्र नंतर तो जगातील सर्वात खतरनाक दहशतवाद्यांपैकी एक बनला. 11 सप्टेंबर 2001 रोजी 19 दहशतवाद्यांनी चार व्यावसायिक विमानांचे अपहरण केले. यातील दोन विमाने युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकामधील वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या नॉर्थ आणि साऊथ टॉवर्सला धडकली होती. या हल्ल्यात 93 देशांतील 2977 लोकांचा मृत्यू झाला होता. अल कायदा या दहशतवादी संघटनेने हा हल्ला केला होता आणि ओसामा बिन लादेनला अल-जवाहरीने मदत केली होती, असा आरोप अमेरिकेने केला होता.

या हल्ल्यानंतर अमेरिकेने ओसामा बिन लादेन आणि जवाहिरी या दोघांवर मोठ्या रक्कमेची बक्षिस ठेवले होते. 2011 मध्ये पाकिस्तानात ओसामा बिन लादेनला मारल्यानंतर जवाहिरी अल-कायदावर लक्ष ठेवत असे. परिणामी अमेरिकेने जवाहिरीवर 25 दशलक्ष डॉलर्सचे बक्षीस जाहीर केले होते. न्यूयॉर्क टाइम्स, द वॉशिंग्टन पोस्ट आणि सीएनएन यांनी काही गुप्त स्त्रोतांचा हवाला देऊन जवाहिरीचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे. 31 ऑगस्ट 2021 रोजी अमेरिकन सैन्याने देशातून माघार घेतल्यापासून अफगाणिस्तानमधील अल-कायदावरील अमेरिकेचा हा पहिला ड्रोन हल्ला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in