भाजप नेत्यांना पक्षात प्रवेश नाही! अखिलेश यादवांची मोठी घोषणा

उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीच्या (UP Election 2022) तोंडावर भाजपला मोठी गळती लागली आहे.
Akhilesh Yadav
Akhilesh Yadavsarkarnama

लखनौ : उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीच्या (UP Election 2022) तोंडावर भाजपला मोठी गळती लागली आहे. भाजपच्या (BJP) मंत्र्यांसह काही आमदारांनी समाजवादी पक्षात (Samajawadi Party) प्रवेश केला आहे. पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी भाजप नेत्यांसाठी आता नो एंट्रीचा बोर्ड लावला आहे. भाजपमधील एकाही नेत्याला प्रवेश न देण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.

भाजपला धक्के देत समाजवादी पक्षाने फोडाफोडीच्या राजकारणात मोठी आघाडी घेतली आहे. अनेक भाजप नेते समाजवादी पक्षात दाखल होत आहेत. आता यापुढे भाजप नेत्यांना पक्षाचे दरवाजे बंद करण्याची घोषणा अखिलेश यादव यांनी आज पत्रकार परिषदेत केली. यामुळे आगामी काळात भाजपमधून समाजवादी पक्षात दाखल होणाऱ्या नेत्यांची गर्दी कमी होणार आहे.

भाजपचा कोणाताही आमदार, मंत्री यांना मी पक्षात घेणार नाही. भाजपला कुणाचे तिकिट नाकारायचे असेल ते नाकारू द्या, असे यादव म्हणाले. भीम आर्मीशी जागावाटपाच्या फिसकटलेल्या चर्चेबाबत ते म्हणाले की, मी त्यांना दोन जागा देण्याची तयारी दर्शवली होती. परंतु, भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांना कुणाचा तरी फोन आला आणि त्यांनी आघाडीत सहभागी होण्यास नकार दिला.

Akhilesh Yadav
अखेर ठरलं! अयोध्या अन् मथुरेकडे पाठ फिरवून योगी सुरक्षित मतदारसंघात!

दरम्यान, काल (ता.14) भाजपचे माजी मंत्री स्वामीप्रसाद मौर्य (Swami Prasad Maurya), धरमसिंह सैनी यांच्यासह पाच आमदारांनी समाजवादी पक्षात अखिलेश यादव यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. मागील चार दिवसांत या नेत्यांनी भाजपला रामराम ठोकला आहे. आणखी काही मंत्री व आमदार भाजपला सोडचिठ्ठी देणार असल्याची चर्चा आहे. दिल्लीत मागील दोन दिवस उमेदवारांच्या नावांवर बैठकांचे सत्र सुरू असताना राज्यात नेते पक्ष सोडून जात होते. सर्वांनीच अखिलेश यांचा हात धरल्याने भाजपला धक्का बसला आहे. कारण या निवडणुकीत भाजप व समाजवादी पक्षातच थेट लढत होणार असल्याचे चित्र आहे.

Akhilesh Yadav
जिल्हा बँकेच्या अध्यक्ष निवडीबाबत अजितदादांचं मोठं विधान

समाजवादी पक्षाच्या कार्यालयासमोर काल (ता.14) झालेला पक्षप्रवेशाचा कार्यक्रम वादात अडकला आहे. समाजवादी पक्षाकडून या कार्यक्रमाला व्हर्चुअल सभा असे नाव दिले होते. पण प्रत्यक्षात या कार्यक्रमाला हजारो कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. त्यामध्ये कोरोनाच्या (Covid19) नियमांचे पालनही करण्यात आले नाही. त्यावरून वाद निर्माण झाला आहे. निवडणूक आयोगाने कठोर भूमिका घेतली आहे. पोलिसांनाही या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com