`भाजप दहा मार्च रोजी हद्दपार होणार, मी येतोय...`

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी व्यक्त केला विजयाचा दावा
`भाजप दहा मार्च रोजी हद्दपार होणार, मी येतोय...`
Akhilesh Yadavsarkarnama

लखनौ : भारतीय जनता पक्षाची उत्तर प्रदेशातील (UP election 2022) सत्ता येत्या दहा मार्च रोजी संपुष्टात येणार असल्याचा दावा माजी मु्ख्यमंत्री अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी आज केला. उत्तर प्रदेशसह पाच राज्यांतील निवडणुका आज आयोगाने जाहीर केल्या. त्यानंतर माध्यमांशी बोलताना यादव यांनी या लढाईसाठी समाजवादी पक्ष पूर्ण सज्ज असल्याचा विश्वास व्यक्त केला.

Akhilesh Yadav
बिगुल वाजला! उत्तर प्रदेशात 7 टप्पे, मणिपूर 2 तर पंजाब, गोवा, उत्तराखंडमध्ये एकाच टप्प्यात मतदान

या निवडणुकीत आगामी काही दिवसांसाठी कोरोनामुळे सभा, रॅली, मेळावे यांना बंदी घालण्यात आली आहे. केवळ व्हर्च्युअल प्रचार करता येणार आहे. त्याला यादव यांनी आक्षेप घेतला असून छोट्या राजकीय पक्षांकडे पुरेशी संसाधने नाहीत. त्यांना मतदारांपर्यंत पोहोचण्यात अडचणी येणार आहे. भाजपकडे यासाठी मोठ्या प्रमाणात साधनसंपत्ती असल्याने त्यांना याचा फायदा होता. त्यासाठी निवडणूक आयोगाने राष्ट्रीय चॅनेलवर प्रादेशिक व छोट्या पक्षांना स्थान मिळेल, याची दक्षता घेण्याची गरज आहे.

समाजावादी पक्ष या निवडणुकीसाठी पूर्ण तयारीत आहे. व्हर्च्युअल प्रचारासाठीही आमची तयारी आहे. आमच्या काळात लॅपटाॅप विद्यार्थ्यांना देण्यात आले होते. त्याचाच फायदा आज भाजप घेत आहे. जिओचे नेटवर्क सर्वात चांगले लखनौमध्येच आहे, असा दावा त्यांनी केला.

Akhilesh Yadav
पाच राज्यांच्या निवडणुकीचा संग्राम; पक्षीय बलाबल काय? हे मुद्दे गाजणार

किसान, नौजवान, महिला, मागास, दलित, अल्पसंख्याक, व्यापारी यांच्यासाठी खूषखबर, दहा मार्च रोजी अखिलेश यादव येत आहेत, असा विश्वास समाजवादी पक्षाने व्यक्त केला.

राज्यात सात टप्प्यांत विधानसभा निवडणूक होत असून त्यात प्रमुख सामना हा भाजप आणि समाजवादी पक्ष यांच्यात होणार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यात पुन्हा भाजपचे सरकार आल्यास त्याला केंद्रातील मोदी सरकारचा फायदा होणा असून हे `डबल इंजिन` राज्याचे हिताचे असल्याचे सांगत आहे. तर हे डबल इंजिन काही उपयोगाचे नसून 2022 मध्ये `सायकल`च येणार असल्याचे समाजवादी पक्ष म्हणत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.