भाजप, काँग्रेसला जमलं नाही ते एका हॉटेलवाल्यानं केलं; थेट महापालिकेवर एकहाती सत्ता

एका हॉटेलवाल्याने भाजप आणि काँग्रेससह इतर पक्षांना धोबीपछाड देत महापालिका जिंकली आहे.
Ajoy Edwards News Updates | Latest Political News in Marathi | Latest Marathi News Updates
Ajoy Edwards News Updates | Latest Political News in Marathi | Latest Marathi News UpdatesSarkarnama

कोलकता : दार्जिलिंग : भाजप (BJP) आणि काँग्रेससह (Congress) इतर राजकीय पक्षांना जमले नाही ते एका हॉटेलवाल्याने करुन दाखवले आहे. अजोय एडवर्ड्स (Ajoy Edwards) असे त्यांचे नाव असून, त्यांनी एकहाती महापालिकेची सत्ता मिळवली आहे. हा प्रकार दार्जिलिंग (Darjeeling) महापालिकेत घडला आहे. दार्जिलिंग महापालिकेतील 32 पैकी 18 जागा एडवर्ड्स यांच्या हमरो पार्टीला मिळाल्या आहेत. पक्ष स्थापन करून तीनच महिन्यांत महापालिकेत सत्ता मिळवण्याची कमाल त्यांनी केली आहे.

पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) 108 महापालिका आणि नगरपालिकांपैकी 102 ठिकाणी विजय मिळवणाऱ्या तृणमूल काँग्रेसला दार्जिलिंगमध्ये केवळ 2 जागा मिळाल्या आहेत. मागील वेळी दार्जिलिंगमध्ये तृणमूलला फक्त एक जागा मिळाली होती. तृणमूल काँग्रेसने (TMC) राज्यात मोठा विजय मिळवला असला तरी हमारो पार्टीच्या या अनोख्या यशाची सर्वाधिक चर्चा होत आहे. एडवर्ड्स यांनी केवळ तीन महिन्यांपूर्वी हमरो पार्टीची स्थापना केली होती. त्यानंतर लगेचच त्यांनी महापालिकेत सत्ता मिळवली आहे. या विजयानंतर बोलताना एडवर्ड्स म्हणाले की, महापालिकेचे नेतृत्व करण्यासाठी दार्जिलिंगच्या नागरिकांना प्रामाणिक लोक हवे आहेत, हे सिद्ध करणारा आमचा विजय आहे. (Latest Political News in Marathi)

Ajoy Edwards News Updates | Latest Political News in Marathi | Latest Marathi News Updates
विधिमंडळानं कळवलं नाही पण आमचं ठरलंय! भाजपच्या 12 आमदारांची 9 महिन्यांनी होणार एंट्री

राज्यातील 108 महापालिका आणि नगरपालिका निवडणुकांपैकी (Civic Polls) 102 ठिकाणी तृणमूल काँग्रेसने (TMC) विजय मिळवला आहे. डाव्यांना केवळ एका ठिकाणी विजय मिळाला असून, भाजप आणि काँग्रेसला खातेही खोलता आलेले नाही. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्यासमोर सगळे विरोधी पक्ष हतबल झाले आहेत. डाव्या पक्षांनी एकमेव विजय मिळवला असून, ताहेरपूर महापालिकेत त्यांनी विजय मिळवला आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीत 77 जागा जिंकून भाजप प्रमुख विरोधी पक्ष बनला होता. परंतु, भाजपला (BJP) आता एकाही ठिकाणी सत्ता मिळवता आलेली नाही. काँग्रेसचीही (Congress) तीच अवस्था आहे.

Ajoy Edwards News Updates | Latest Political News in Marathi | Latest Marathi News Updates
मोठी घडामोड : दिशाच्या मृत्यूचे पुरावे नितेश राणे थेट न्यायालयात सादर करणार

ममता बॅनर्जींच्या करिष्म्यासमोर सगळेच विरोधी पक्ष नाकाम ठरले आहे. तृणमलूने 102 ठिकाणी विजय मिळवला असून, 31 ठिकाणी विरोधकांना खातेही खोलता आलेले नाही. यामुळे पुन्हा एकदा ममतांनी बंगालवर निर्विवाद आपलेच वर्चस्व असल्याचे दाखवून दिले आहे. या निवडणुकांमुळे राजकीय वातावरण तापले होते. या निवडणुकीत एकूण 2 हजार 171 जागा आहेत. त्यातील तब्बल 1 हजार 870 जागा तृणमूलने जिंकल्या आहेत. भाजपला 63 जागा जिंकता आल्या आहेत. काँग्रेसला 59 तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला 55 जागा मिळाल्या आहेत. भाजप आणि काँग्रेस एकाही महापालिका अथवा नगरपालिकेत सत्ता मिळवता आलेली नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com