US-Russia Conflicts: विमान-ड्रोनची धडक; रशिया-अमेरिकेतील तणाव वाढला

रशिया आणि युक्रेनमध्ये आधीच युद्ध सुरु असताना आता अमेरिका आणि रशियातील तणावही वाढला आहे.
US-Russia Conflicts:
US-Russia Conflicts:Sarkarnama

US-Russia Conflicts: एकीकडे गेल्या वर्षभरापासून रशिया-युक्रेन यांच्यात युद्ध सुरु आहे. तर दुसरीकडे आता रशिया आणि अमेरिकेतील तणाव वाढवणारी बातमी समोर आली आहे. काळ्या समुद्रात रशियन सुखोई-27 विमान अमेरिकेच्या रीपर ड्रोनला धडकल्याची बातमी आहे.या घटनेबाबत अमेरिका आणि रशियाने आपापल्या भूमिका मांडल्या आहेत. या घटनेचा दोन्ही देशांनी तीव्र निषेध करत नक्की कोणी कोणाचे ड्रोन पाडले, असा सवाल एकमेकांना विचारत आहेत.

रशियन जेट आणि अमेरिकन ड्रोन काळ्या समुद्रावर घिरट्या घालत असताना ही घटना घडल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. रशियन Su-27 हे लढाऊ विमान अमेरिकेच्या MQ-9 रीपर ड्रोनला धडकले, त्यामुळे अमेरिकन ड्रोन थेट काळ्या समुद्रात पडले. असा दावा अमेरिकेने केला आहे.

US-Russia Conflicts:
Kisan Sabha Long March : किसान मोर्चात नवा ट्विस्ट : बैठक रद्द, सरकारनेच आमच्याकडे यावं ; नेत्यांची आक्रमक भूमिका!

या घटनेनंतर दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन्ही देश एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. त्याच वेळी,संरक्षण विभाग याचा घटनेचा व्हिडिओ जारी करेल, असे पेंटागॉनच्या प्रवक्त्याने सांगितले आहे. तर पाडलेले ड्रोन अद्याप परत मिळालेले नाही.ते चुकीच्या हाती लागू नये म्हणून त्याचा शोध घेतला जात असल्याचे अमेरिकेच्या एका अधिकाऱ्याने म्हटले आहे.

अमेरिकाचा रशियावर आरोप?

पेंटागॉन आणि यूएस युरोपियन कमांडने या घटनेबाबत दिलेल्या माहितीनुसार, युएस ड्रोन काळ्या समुद्रावर नियमितपणे घिरट्या घालत असते. पण दोन रशियन एसयू-27 जेट विमानांनी आधी यूएस ड्रोनला घेरले आणि त्यावर हवेतच इंधनाचा मारा केला. त्यानंतर रशियन जेटने ड्रोनच्या आजूबाजूला 30 ते 40 मिनिटे घेराव घातला. त्यानंतर रशियन विमानांपैकी एकाने MQ-9 च्या प्रोपेलरला धडक दिली, ज्यामुळे अमेरिकन ड्रोन काळ्या समुद्रात कोसळले.

काळा समुद्र हा रशिया आणि युक्रेनच्या सीमारेषा जोडतो. युक्रेनच्या मुद्द्यावरून या भागावरुन दोन्ही देशांमध्ये गेल्या बऱ्याच वर्षांपासून तणाव आहे. यूएस ड्रोन समुद्रातील हद्दीत नियमित उड्डाण करत होते. पण ही टक्कर अपघाती होती की हेतुपुरस्सर हे स्पष्ट झाले नसले तरी रशियन विमान ड्रोनला अडवण्याचा प्रयत्न करत होते हे दोन्ही बाजू मान्य करत आहेत. यूएस एअर फोर्सचे अधिकारी जनरल जेम्स हेकर यांनी म्हटले आहे.

रशियाने स्पष्ट केली भूमिका?

रशियन संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेचे ड्रोन रशियाच्या सीमेजवळ उड्डाण करत होते. अमेरिकेचे ड्रोन आंतरराष्ट्रीय सीमेबाहेर असलेल्या भागात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळेच रशियन सैन्याने अमेरिकन ड्रोनला रोखण्यासाठी ही कारवाई केली. रशियाच्या कारवाईमुळे अमेरिकेच्या ड्रोन अनियंत्रि झाले आणि समुद्रात कोसळले. मात्र त्यांचे लढाऊ विमान अमेरिकन ड्रोनला धडकले नाही, तर ड्रोन आधीच काळ्या समुद्रात पडले होते.

यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. 2020 मध्ये काळ्या समुद्राच्या प्रदेशात, रशियन लढाऊ विमानाने काळ्या समुद्रावरील यूएस बी-52 बॉम्बरचा मार्ग रोखण्याचा प्रयत्न केला. दोन्ही विमाने 30 मीटर जवळ आले होते. विशेष म्हणजे 2014 मध्ये रशियाने क्रिमिया ताब्यात घेतल्यापासून अमेरिकेच्या युद्धनौका काळ्या समुद्रात सातत्याने तैनात केल्या जात आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in