AIMIM : असदुद्दीन ओवेसींना दणका; 250 पदाधिकारी देणार राजीनामा

AIMIM| Asaduddin Owaisi| प्रयागराजमध्ये 10 जून रोजी नमाजानंतर प्रयागराजमध्ये मोठा हिंसाचार उफाळला होता
Asaduddin Owaisi|AIMIM|
Asaduddin Owaisi|AIMIM|

लखनऊ : एआयएमआयएम चे नेते आणि खासदार असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांना मोठा धक्का बसला आहे. प्रयागराजमध्ये आज एमआयएमचे (AIMIM) जवळपास 250 कार्यकर्ते सामूहिक राजीनामा देणार असल्याची माहिती समोर आली आहे. जिल्हाध्यक्ष शाह आलम यांच्या समर्थनार्थ पक्षाच्या अडीचशे कार्यकर्त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. राज्य आणि सर्वोच्च नेतृत्व आपल्याला दुय्यम वागणूक देत असल्याचा आरोप त्यांनी केला. अशात जिल्हा सरचिटणीस फैसल वारसी यांच्या नेतृत्वाखाली आज 250 राजीनामा देणार आहेत.

शाह आलम यांच्यावर झालेल्या आरोपांविरोधात आवाज उठवण्यासाठी अनेकदा विनंती करण्यात आली, पण त्यांनी दखल घेतली नाही. अटाला हिंसाचार प्रकरणी शाह आलम निर्दोष असल्याचा दावा फैसल वारसी यांनी केला आहे. शाह आलम नेहमीच लोकांना शांतता आणि सौहार्दाचे आवाहन करत असतात, पण आता त्यांना कोणतेही कारण न देता त्यांना या प्रकरणात गोवण्यात आल्याचे वारसी यांचे म्हणणे आहे. असे असतानाही पक्ष नेतृत्त्वाने यावर कोणताही आक्षेप घेतला नसल्याची खंत वारसी यांनी व्यक्त केली आहेे.

Asaduddin Owaisi|AIMIM|
Aimim : औरंगाबाद पाहिजे की संभाजीनगर ? मतदान घ्या ; इम्तियाज जलील यांची मागणी..

या कारणास्तव सायंकाळी चार वाजता एमआयएमचे सुमारे अडीच ते तीनशे लोक दर्श अजमल येथील शहर कार्यालयात सामूहिक राजीनामे देणार आहेत. तथापि, एआयएमआयएम राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी या संपूर्ण प्रकरणाची दखल घेतील, अशी आशा व्यक्त केली आहे. एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शाह आलम यांच्यावर अटाळा हिंसाचारात हात असल्याचा आरोप आहे. अलीकडेच अलाहाबाद उच्च न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता.

काय आहे प्रकरण?

प्रयागराजमध्ये 10 जून रोजी नमाजानंतर प्रयागराजमध्ये मोठा हिंसाचार उफाळला होता. या प्रकरणी आरोपी एमआयएमचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद शाह आलमसह अनेक आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. निदर्शनादरम्यान शाह आलम यांनी जमावाला भडकवल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला, त्यानंतर हिंसाचार पसरला. शाह आलमचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in