विकाससिंह म्हणतात, 'एम्स'चे डॉक्टर माझ्या कॉलचे उत्तरच देत नाहीत!

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूच्या तपासावरून अद्याप गदारोळ सुरू आङे. एम्सच्या अहवालात सुशांतने आत्महत्या केली असल्याचे म्हटले आहे मात्र, त्याचे कुटुंबीय याबद्दल शंका उपस्थित करीत आहेत.
aiims sudhir gupta is not answering my phone said lawyer vikas singh
aiims sudhir gupta is not answering my phone said lawyer vikas singh

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) त्याच्या मृत्यूचे गूढ उकलले आहे. सीबीआयने सुशांतने आत्महत्या केली असून, त्याची हत्या झाली नसल्याचा निष्कर्ष काढला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 'एम्स'च्या अहवालाच्या आधारे हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. दरम्यान, 'एम्स'च्या डॉक्टरांची एक ऑडिओ क्लीप व्हायरल झाली आहे. यावरुन सुशांतच्या कुटुंबीयांचे वकील विकाससिंह यांनी याबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीबीआयने दोन वेळा सुशांतच्या मृत्यूच्या वेळचा घटनाक्रम त्याच्या फ्लॅटमध्ये तयार करुन पुन्हा तपासला होता. त्यानंतर सीबीआयच्या पथकासमवेत अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) तीन न्यायवैद्यक तज्ञांनी मुंबईतील सुशांतच्या घराची तपासणी केली होती. या  पथकाने सुशांतचा फ्लॅट आणि इमारतीच्या छताची काही काळ तपासणी केली होती. या पथकाने सुशांतच्या मृत्यूची वेळ शवविच्छेदन अहवालात नसल्याबद्दल प्रश्नचिन्हही उपस्थित केले होते. 

सीबीआयकडे 'एम्स'च्या पथकाने अहवाल सादर केला आहे. मुंबई पोलिसांनी दिलेला सुशांतचा शवविच्छेदन अहवाल आणि इतर पुराव्यांच्या आधारे तपासणी करुन 'एम्स'च्या पथकाने हा अहवाल तयार केला आहे. सीबीआयने या अहवालाचा अभ्यास केला. या प्रकरणातील इतर पुराव्यांच्या आधारे सीबीआय अंतिम निष्कर्षापर्यंत पोचली आहे. 'एम्स'च्या अहवालात सुशांतवर विषप्रयोग झाला नसल्याची बाबही नमूद करण्यात आली आहे. यामुळे सुशांतने आत्महत्या केली असून, त्याची हत्या झाली नसल्याचा निष्कर्ष सीबीआयने काढला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

याविषयी बोलताना 'एम्स'च्या न्यायवैद्यक विभागाचे प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता म्हणाले की, सुशांतच्या शरीरावर गळफासाव्यतिरिक्त कोणतीही इतर जखम नव्हती. याचबरोबर त्याचा कोणाशी संघर्ष अथवा झटापट झाल्याच्याही शरीरावर कोणत्याही खुणा आढळलेल्या नाहीत. त्याच्या कपड्यांवरही अशा प्रकारच्या खुणा सापडलेल्या नाहीत. 

डॉ.गुप्ता यांची एक ऑडिओ क्लीप व्हायरल झाली आहे. यात ते सुशांतची हत्या झाली असावी, असे म्हणत आहेत. याच डॉक्टरांच्या नेतृत्वाखालील पथकाने सुशांतने आत्महत्या केल्याचा अहवाल दिला आहे. यावरुन सुशांतच्या कुटुंबीयांचे वकील विकाससिंह यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. याचबरोबर त्यांनी थेट डॉ. गुप्ता यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र, गुप्ता हे त्यांचा कॉल उचलत नसल्याचे सिंह यांनी म्हटले आहे. 

याविषयी बोलताना विकाससिंह म्हणाले की, या प्रकरणी मला डॉ. गुप्ता यांच्याशी बोलायचे आहे. त्यांच्याशी बोलणे होईपर्यंत मी पुढील कोणतेही पाऊल उचलणार नाही. ते माझ्या कॉलचे उत्तर देत नाहीत. ते एखादेवेळी त्यांची भूमिकाही बदलू शकतात. त्यामुळे त्यांच्याशी बोलणे होईपर्यंत मी वाट पाहीन. 

सुशांत हा 14 जूनला मृतावस्थेत आढळला होता आणि साडेतीन महिन्यांनंतरही त्याच्या मृत्यूचे गूढ कायम होते. या प्रकरणी सुरूवातीला मुंबई पोलीस तपास करीत होते. मुंबई पोलिसांनी हा आत्महत्येचा प्रकार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, अभिनेत्री कंगना राणावत, भाजपचे खासदार सुब्रह्मण्याम स्वामी आणि राज्यातील भाजप नेत्यांनी सुशांतची हत्या झाल्याचा दावा केला होता. यात नंतर बिहार सरकारनेही उडी घेतली होती. बिहारमध्ये एफआयआर दाखल करुन तेथील पोलीस पथक तपासासाठी मुंबईत दाखल झाले होते. हा तपास सीबीआयकडे सोपवावा यासाठी विरोधी पक्ष भाजपने आणि बिहार सरकारने आक्रमक भूमिका घेतली होती. अखेर सर्वोच्च न्यायालयाने हा तपास सीबीआयकडे सोपवला होता. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com