सावधान : हवेतूनही पसरतोय जीवघेणा म्युकरमायकोसिस

देशातील कोरोनाचा कहर वाढत असून, काळी बुरशी म्हणजेच म्युकरमायकोसिस जीवघेणा आजार कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना होत आहे.
aiims professor nikhil tandon says black fungus can spread through air
aiims professor nikhil tandon says black fungus can spread through air

नवी दिल्ली : देशातील कोरोनाचा (Covid19) कहर वाढत असून, यात आता नवीन आजाराची भर पडली आहे. काळी बुरशी (Black Fungus) म्हणजेच म्युकरमायकोसिस (Mucormycosis) हा जीवघेणा आजार कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना होत आहे. या आजाराचे रुग्ण देशभरात वेगाने वाढू लागले असून, अनेक जणांचा मृत्यूही झाला आहे. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (AIIMS) प्राध्यापक डॉ. निखिल टंडन (Nikhil Tandon) यांनी हा आजार हवेतून पसरू शकतो, असा इशारा दिला आहे. 

म्युकरमायकोसिसमुळे आतापर्यंत देशभरात 7 हजारहून अधिक जणांना संसर्ग झाला आहे. याआधी सार्सची साथ आली होती त्यावेळी या आजाराचे काही रुग्ण सापडले होते. याबाबत बोलताना डॉ. टंडन म्हणाले की, म्युकरमायकोसिस हा हवेतून पसरू शकतो परंतु, त्यामुळे निरोगी व्यक्तींना यामुळे काही समस्या होणार नाही. तो फुफ्फुस्सातही प्रवेश शकतो मात्र, याची शक्यता अतिशय कमी आहे. तुमची प्रतिकारशक्ती चांगली असेल तर तुम्हाला काही होणार नाही. तुमचे शरीर त्याच्याशी समर्थपणे लढू शकते. त्यामुळे तो तुमच्या शरीरात गेला तरी प्रतिकारशक्तीमुळे त्याला आळा बसेल. 

एम्सचे संचालक डॉ.रणदीप गुलेरिया यांनी यासाठी स्टेरॉईड्सचा अतिवापरास जबाबदार धरले होते. ते म्हणाले होते की, म्युकरमायकोसिस होण्यामागील प्रमुख कारण हे स्टेरॉईड्सचा गैरवापर हे आहे. कोरोनाबाधित, मधुमेह आणि इतर रुग्ण स्टेरॉईड्स घेत आहेत. यामुळे त्यांना बुरशीजन्य आजार होण्याची शक्यता अधिक आहे. हे रोखण्यासाठी आपल्याला तातडीने स्टेरॉईड्सचा गैरवापर थांबवायला हवा. हा आजार तोंड, नाक, डोळ्याची बुबुळे आणि मेंदूवर परिणाम करु शकतो. यामुळे दृष्टी जाऊ शकते आणि तो फुफ्फुसातही पसरू शकतो.  

कोरोनाच्या या लाटेत उपचारासाठी स्टेरॉईड्सचा वापर वाढला आहे. सौम्य लक्षणे असताना अथवा आजाराच्या सुरवातीला टप्प्यात स्टेरॉईड्सचे मोठे डोस दिले जात आहेत. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढत असून, म्युकरमायकोसिस होण्याची शक्यता आणखी बळावत आहे. गरज नसताना अथवा सौम्य लक्षणे किंवा आजाराच्या सुरवातीच्या टप्प्यात स्टेरॉईड्स दिल्याने हा संसर्ग होत आहे. हा आजार रोखण्यासाठी प्रथम रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवायला हवे. स्टेरॉईड्सवर असणाऱ्या व्यक्तींना रक्तातील साखर नियंत्रणात ठेवावी. याचबरोबर त्यांना स्टेरॉईड देताना काळजी घ्यावी, असा सल्ला गुलेरिया यांनी दिला होता. 

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशा परिस्थितीत आपण रुग्णालयात संसर्ग रोखण्यासाठी अतिशय काळजीपूर्वक पद्घतीने नियम पाळायला हवेत. बुरशी आणि जिवाणू संसर्गाची अनेक प्रकरणे आता समोर येऊ लागली आहेत. यामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाणही अधिक आहे, असे डॉ. गुलेरिया यांनी सांगितले होते. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com