पत्नीनं रंगेहाथ पकडताच काँग्रेसच्या बड्या नेत्याची राजकारणातून विश्रांती

ठार मारण्यासाठी पत्नीनं तांत्रिकाची मदत घेतल्याचा खळबळजनक आरोप
पत्नीनं रंगेहाथ पकडताच काँग्रेसच्या बड्या नेत्याची राजकारणातून विश्रांती
Bharatsinh Solanki Sarkarnama

अहमदाबाद : काँग्रेसचे (Congress) माजी प्रदेशाध्यक्ष भरतसिंह सोलंकी (Bharatsinh Solanki) हे आता चांगलेच अडचणीत आले आहेत. त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला होता. त्यांच्या पत्नीनेच व्हिडीओ बनवला होता आणि पतीचे दुसऱ्या महिलेसोबत संबंध असल्याचा आरोप केला होती. यानंतर सोलंकी यांनी राजकारणातून काही काळ विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे. (Bharatsinh Solanki News)

सोलंकी यांनी आता राजकारणापासून काही काळ दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. ते राजकारणातून काही महिने विश्रांती घेणार आहेत. याबद्दल ते म्हणाले की, मी राजकारणातून काही महिने दूर राहणार असून, सामाजिक कार्यावर भर देणार आहे. दलित, आदिवासी, अल्पसंख्याक आणि मागास वर्गातील नागरिकांना मी अधिक वेळ देणार आहे. हा निर्णय मी पक्षश्रेष्ठींच्या सांगण्यानुसार नव्हे तर स्वत:हून घेत आहे.

गुजरातच्या विधानसभा निवडणुका यावर्षी होत आहेत. त्यामुळे विरोधकांच्या इशाऱ्यावर माझी पत्नीकडून बदनामी सुरू आहे, असा आरोप करून सोलंकी म्हणाले की, मला आणि काँग्रेसला आगामी निवडणुकीत फटका बसावा, यासाठी विरोधकांनी माझ्या पत्नीचा वापर केला आहे. अशा प्रकारच्या गोष्टींमध्ये विरोधकांना रस आहे. माझी प्रतिमा मलिन करून त्याचा फायदा घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मी आधीच घटस्फोटासाठी अर्ज केलेला आहे. आम्ही अनेक वर्षे सोबत राहत नाही. माझा जीव घेण्यासाठी पत्नीनं तांत्रिकाची मदतही घेतली होती. मला घटस्फोट मिळाल्यानंतर मी दुसरा विवाह करू शकतो. माझ्या घटस्फोटाच्या अर्जावर 15 जूनला सुनावणी होणार आहे.

Bharatsinh Solanki
मोठी घडामोड : मुख्यमंत्री पहिल्यांदाच निवडणूक लढवणार; भाजपनं कसली कंबर

भरतसिंह सोलंकी यांच्या पत्नी रेश्मा पटेल यांना त्यांचा पती एका महिलेसोबत असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी मिळाली होती. त्यानंतर त्या तातडीनं काही लोकांना घेऊन तिथ पोचल्या होत्या. त्यांनी घरात घुसून सोलंकींच्या सोबत असलेल्या महिलेला मारहाण केली होती. त्यावेळी इतर लोकांनी याचा व्हिडीओ काढून सोशल मिडीयावर पोस्ट केला होता. हा व्हिडीओ व्हायरल झाला होता.

या व्हिडीओत रेश्मा पटेल त्या महिलेला गुजराती भाषेत बोलताना तसेच, मारताना दिसत होत्या. हा व्हिडीओ काढला जात असताना महिलेने आपला चेहरा लपवण्याचा प्रयत्न केला होता. याबाबत रेश्मा पटेल म्हणाल्या होत्या की राजकीय प्रभावाचा वापर करुन अनेक वेळा सोलंकी यांनी माझ्यावर अन्याय केला. याआधीही भरतसिंह यांनी मला घरातून बाहेर काढले होते. मात्र, मी कुटुंबासाठी परदेशात निघून गेले होते. आता मी पुन्हा भारतात आले आहे. मी घटस्फोट देणार नाही.

Bharatsinh Solanki
केंद्रीय मंत्रिमंडळातून नक्वींना डच्चू? एकमेव मुस्लिम चेहराही 'आऊट' होण्याची चिन्हे

भरतसिंह सोलंकी हे माजी मुख्यमंत्री माधवसिंह सोलंकी यांचे पुत्र आहेत. रेश्मा आणि भरतसिंह यांच्यात सध्या कायदेशीर लढाई सुरू आहे. याआधीही या पती-पत्नींनी एकमेकांवर मारहाणीचे आरोप केले होते. काही महिन्यांपूर्वी भरतसिंह सोलंकी यांच्यावर पत्नीने घरगुती हिंसाचाराचा आरोप केला होता. मात्र, असे असूनही त्यांनी भरतसिंह यांना घटस्फोट देण्यास नकार दिला होता. पटेल यांनी पतीविरोधात न्यायालयात याचिकाही दाखल केली आहे. मागील अनेक वर्षांपासून हा वाद सुरू आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in