उत्तर प्रदेशात 20 जानेवारीपर्यंत दररोज भाजपचा 1 मंत्री अन् 3-4 आमदार राजीनामा देणार!

विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) तोंडावर उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) भाजपच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे.
Dharam Singh Saini
Dharam Singh Saini Sarkarnama

लखनौ : विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) तोंडावर उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) भाजपच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. भाजपला (BJP) दोन दिवसांत तीन मंत्री आणि पाच आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजपची गळती वाढत असतानाच आयुष मंत्री धरमसिंह सैनी (Dharam Singh Saini) यांनी आज राजीनामा देताच बॉम्ब टाकला आहे.

दररोज भाजपचा 1 मंत्री आणि 3 ते 4 आमदार 20 जानेवारीपर्यंत राजीनामा देतील, असा खळबळजनक दावा सैनी यांनी केला आहे. ते म्हणाले की, दलित, मागास वर्ग आणि वंचितांचा आवाज दाबण्याचे काम भाजपने 5 वर्षांत केले. यापुढे स्वामीप्रसाद मौर्य म्हणतील ते मी करेन. राज्यात 20 जानेवारीपर्यंत दररोज 1 मंत्री आणि 3 ते 4 आमदार राजीनामा देणार आहेत.

Dharam Singh Saini
लॉकडाऊनमधील पार्टी महागात; ब्रिटनच्या पंतप्रधानांवर संसदेत माफी मागण्याची वेळ

ओबीसींचे मातब्बर नेते स्वामीप्रसाद मौर्य (Swami Prasad Maurya) यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यापासून भाजपमधील गळतीला सुरवात झाली आहे. मौर्य यांनी 11 जानेवारीला राजीनामा दिल्यानंतर चार आमदारांनी पक्षाला रामराम केला होता. त्यानंतर 12 जानेवारीला आणखी एक बडे मंत्री दारासिंह चौहान यांनी पक्षावर राजीनामा बॉम्ब टाकला. चौहान हे भाजप ओबीसी मोर्चाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यानंतर आज मौर्य यांचेच समर्थक आमदार मुकेश वर्मा (Mukesh Verma) यांनी राजीनामा दिला आहे. यानंतर काही वेळातच मंत्री धरमसिंह सैनी यांनी राजीनामा दिला आहे.

Dharam Singh Saini
भाजपचं जहाज बुडणार? कायम जिंकणाऱ्या पक्षात राहणारा नेता पडला बाहेर

मौर्य यांच्या राजीनाम्यानंतर त्यांचे समर्थक मानले जाणारे आमदार रोशन लाल वर्मा, ब्रिजेश प्रजापती, भगवती सागर आणि विनय शाक्य या आमदारांनीही पक्षाचा राजीनामा दिला होता. यात मंत्री दारासिंह चौहान, आमदार मुकेश वर्मा आणि मंत्री धरमसिंह सैनी यांची भर पडली आहे. हे आठही जण मौर्य यांच्याप्रमाणेच समाजवादी पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. मौर्य हे ओबीसी नेते असल्याने उत्तर प्रदेशात भाजपला मोठा फटका बसू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मौर्य यांच्यानंतर इतर नेतेही पक्ष सोडण्याच्या मार्गावर असून, भाजपची डोकेदुखी वाढली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com