काँग्रेसचा हात सोडलेले हार्दिक पटेल भाजपच्या वाटेवर; २ महिन्यांपासून सुरु होत्या गुप्त बैठका

Hardik Patel | Congress | BJP : राजीनामा पत्रात देखील भाजपचे अन् पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक
Hardik Patel, Hardik Patel News updates, Gujrat News Updates, Hardik Patel Latest News in Marathi
Hardik Patel, Hardik Patel News updates, Gujrat News Updates, Hardik Patel Latest News in MarathiSarkarnama

(Hardik Patel Latest News)

गांधीनगर : गुजरात काँग्रेसचे (Congress) कार्यकारी अध्यक्ष हार्दिक पटेल (Hardik Patel) यांनी अखेर काँग्रेसला रामराम केला आहे. पटेल मागील काही दिवसांपासून पक्षावर नाराज होते. आज ट्विट करुन त्यांनी याबाबतची घोषणा केली आहे. आपल्या राजीनामा पत्रात त्यांनी भाजपचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे. त्यामुळे ते भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Hardik Patel resigns from Congress membership)

आपल्या ट्विटमध्ये हार्दिक पटेल म्हणाले, आज मी मोठ्या धैर्याने काँग्रेस पक्षाच्या पदाचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. मला खात्री आहे की माझ्या निर्णयाचे माझे सर्व सहकारी आणि गुजरातचे लोक स्वागत करतील. मला विश्वास आहे की माझ्या या पावलानंतर भविष्यात गुजरातसाठी खरोखर सकारात्मक काम करू शकेन. (Hardik Patel resigns from Congress membership)

Hardik Patel, Hardik Patel News updates, Gujrat News Updates, Hardik Patel Latest News in Marathi
काँग्रेसला मोठा धक्का; अखेर हार्दिक पटेलांनी सोडली 'साथ'

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, हार्दिक पटेल ज्या भाजपच्या विरोधात आंदोलन करुन मोठे नेते बनले त्याच भाजपमधून आपली नवी राजकीय इनिंग सुरु करण्याची शक्यता आहे. मागील दोन महिन्यांपासून ते अधिकृतपणे भाजपच्या संपर्कात होते. सुरुवातीला हार्दिक पटेल यांना सोबत घेण्यासाठी राज्य भाजपमधील काही नेत्यांचा विरोध होता. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी ग्रीन सिग्नल दिल्यानंतर त्यांच्या भाजप प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला.

यानंतर हार्दिक पटेल यांची भाजपचे राष्ट्रीय सचिव बीएल संतोष यांच्यासोबत एक बैठक देखील झाली. हार्दिक पटेल यांना सोबत घेण्याचे मोठे कारण म्हणजे पाटीदार वोट बँक. सध्या हार्दिक पटेल हे हिमाचल प्रदेशमध्ये मंदिर दर्शनासाठी गेले असून ते उद्या अहमदाबादमध्ये परतण्याची शक्यता आहे. यावेळी ते एक पत्रकार परिषद देखील घेणाचा अंदाज आहे. तसेच पुढील आठवड्यामध्ये त्यांचा भाजप प्रवेश होवू शकतो असे सांगितले जात आहे. (Hardik Patel resigns from Congress membership and may join bjp)

Hardik Patel, Hardik Patel News updates, Gujrat News Updates, Hardik Patel Latest News in Marathi
चिकन सँडविचपासून ते परदेश दौऱ्यापर्यंत! हार्दिक पटेलांनी राहुल गांधींना पाडलं उघडं

यापूर्वीही हार्दिक पटेल यांनी काँग्रेसवर जाहीर टीका आणि भाजपच उघड कौतुक केले होते. तसेच त्यांच्या व्हॉट्सअप आणि टेलिग्रामच्या डीपीमुळेही चर्चांना अधिक हवा मिळाली होती. हार्दिक पटेलांच्या व्हॉट्सअ‍प आणि टेलिग्राम डीपीमधून काँग्रेस गायब झाले होते. त्याजागी भगवे वस्त्र परिधान केलेला फोटो आला होता. अलिकडेच त्यांच्या ट्विटर बायोमधूनही काँग्रेस गायब झाले होते. त्यामुळे हार्दिक पटेल लवकरच भारतीय जनता पक्षात प्रवेश करतील, अशा चर्चांना उधाण आले होते.

भाजपचे कौतुक करताना काय म्हणाले होते हार्दिक पटेल?

भाजपने मागील काही काळात घेतलेल्या निर्णय राजकीय हेतून घेतले आहेत. असे असले तरी त्यांच्यात निर्णय घेण्याची ताकद आहे, हे आपल्याला मान्य करावं लागेल. भाजपची बाजू न घेता अथवा त्यांची स्तुती न करताही या सत्य गोष्टी आपण स्वीकारायला हव्यात. गुजरातमध्ये काँग्रेसला भक्कम व्हायचे असेल तर आपण निर्णय क्षमता वाढवायला हवी.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com