जे.पी. नड्डा, राजनाथ सिंह यांच्यानंतर नितीन गडकरीही कोरोना पॉझीटिव्ह

नितीन गडकरी यांना कोरोनाचे सैाम्य लक्षण जाणवत असल्याने त्यांनी कोरोनाची चाचणी केली होती. त्याचा अहवाल पॉझीटिव्ह आला आहे.
जे.पी. नड्डा, राजनाथ सिंह यांच्यानंतर नितीन गडकरीही कोरोना पॉझीटिव्ह
nitin gadkarisarkarnama

नवी दिल्लीः देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहेत. अनेक राजकीय नेते, मंत्री यांना कोरोनाची लागण झाली आहे. मंगळवारी भाजपचे नेते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाची लागण झाली. गडकरी (nitin gadkari) यांनी मंगळवारी रात्री टि्वट करीत ही माहिती दिली. सोमवारी भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा (jp nadda) आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझीटिव्ह आला आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावनसाहेब दानवे, माजी मंत्री गिरीश महाजन यांना कोरोनाची लागण झाली आहे. ते डॉक्टरांच्या सल्लाने ते घरी उपचार घेत आहेत.

नितीन गडकरी यांना कोरोनाचे सैाम्य लक्षण जाणवत असल्याने त्यांनी कोरोनाची चाचणी केली होती. त्याचा अहवाल पॉझीटिव्ह आला आहे. आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करावी, असे टि्वट करुन गडकरी यांनी सांगितले आहे. ते होम क्वारंटाइन आहेत. ''कोरोना विषाणूची बाधा झाल्याचे कळताच स्वत:ला विलग केले. सर्वांनी योग्य ती काळजी घ्या व नियमांचे काटेकोरपणे पालन करा,'' असेही गडकरी यांनी सांगितले.

मुंबईमध्ये कोरोना (Mumbai Corona) आणि ओमायक्रॉनच्या (Omicron) रुग्णांच्या संख्येत वाढ झाली होती. पण आता मुंबईकरांना सलग दुसऱ्या दिवशीही दिलासा मिळाला आहे. आज दुसऱ्यादिवशी कोरोनाबाधित रुग्णांची ( corona patients ) संख्या कमी झाली आहे. मंगळवारी मुंबईत 11 हजार 647 रुग्ण आढळले आहे. गेल्या पाच दिवसातलीही सर्वात कमी संख्या आहे.

nitin gadkari
सिंधुताईंची 'ती' इच्छा मुख्यमंत्री पुर्ण करणार

मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. रुग्णांची संख्याही 25 हजारांच्या पुढे गेली होती. पण, दोन दिवसांपासून रुग्णांची संख्या ही कमी कमी होत चालली आहे. आज मुंबईत ११६४७ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. ९६६७ रग्णांना लक्षण आढळून आलेली नाहीत. तर रूग्णालयातील १४९८० रूग्ण बरे होऊन घरी परतले आहे. तर गेल्या ४८ तासांमध्ये कोरोनामुळे ४ जणाचा मृत्यू झाला आहे. मागील दोन दिवसांमध्ये शहरात पॉझिटिव्ह रुग्णाचे प्रमाण हे 30 टक्के ते 20 टक्के कमी झाले आहे. काही दिवसांपासून दर दिवशी 20 ते 25 रुग्ण संख्या आढळून येत होती. तीच संख्या आता 11647 वर येऊन पोहोचली आहे. शहरातील 80 टक्के हॉस्पिटलमधील बेड रिकामे आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in