रेल्वे मंत्रालयावर 19 तासांत निर्णय मागे घेण्याची नामुष्की पण झाला मोठा फायदा

रेल्वे मंत्रालयाने घेतलेला एक वादग्रस्त निर्णय 19 तासांतच मागे घेण्याची नामुष्की ओढवली आहे.
Indian Railway
Indian Railway Sarkarnama

नवी दिल्ली : उच्चविद्याभूषित असलेले अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) हे केंद्रीय रेल्वे मंत्रालयाची (Railway ministry) धुरा सांभाळत आहेत. त्यांच्या हाती कारभार गेल्यानंतर रेल्वे सुधारेल, अशी आशा होती. परंतु, आता विपरीत घडले आहे. रेल्वे मंत्रालयाने घेतलेला एक मोठा निर्णय रेल्वेच्या अखत्यारीतील इंडियन रेल्वे केटरिंगअँड टूरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) या कंपनीला चांगलाच महागात पडला होता. अखेर हा निर्णय 19 तासांतच मागे घेण्यात आला आहे.

आयआरसीटीसी कंपनीला मिळणाऱ्या शुल्काबाबत रेल्वेने मोठा निर्णय घेतला होता. कंपनीला मिळणाऱ्या शुल्कापैकी निम्मे शुल्क रेल्वे घेणार असल्याचा हा निर्णय होता. यानंतर मुंबई शेअर बाजारात काल आयआरसीटीसीचा शेअर 29 टक्क्यांनी गडगडला. तो 650.10 रुपयांवर आला. आयआरसीटीसी ही कंपनी रेल्वेतील खाद्यपदार्थ, ऑनलाइन तिकिट आणि केंटरिंग सेवेचे व्यवस्थापन करते. यापोटी कंपनीला शुल्क मिळते. रेल्वेच्या निर्णयामुळे आयआरसीटीसीला मोठा फटका बसला आहे.

अखेर गुंतवणूक व सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाने हा निर्णय मागे घेतल्याची घोषणा 19 तासांत केली. यामुळे मुंबई शेअर बाजारात कालच्या घसरणीनंतर आज आयआरसीटीसीच्या शेअरने उसळी घेतली. आयआरसीटीसीचा समभाग 39 टक्के वाढीसह 906 रुपयांवर व्यवहार करीत आहे. रेल्वेने निर्ण मागे घेतल्याचा फायदा आज आयआरसीटीसीला झाला आहे.

Indian Railway
अश्विनी वैष्णव यांच्या रेल्वे मंत्रालयाचा एक निर्णय पडला चांगलाच महागात

वैष्णव यांच्या रुपाने रेल्वे व माहिती तंत्रज्ञान खात्याला त्याच तोडीचे कॅबिनेट मंत्री मिळाले आहेत. वैष्णव यांचा बायोडाटाही आधी सोशल मीडियात व्हायरल झाला होता. त्यांनी घेतलेल्या पदव्या, उच्च पदांवर केलेले काम याची माहिती त्यामध्ये होती. वैष्णव यांनी इलेक्ट्रानिक्स अॅन्ड कम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये पदवी संपादन केली आहे. ते सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले होते. त्यानंतर कानपूर आयआयटीतून पदव्यूत्तर पदवी तर अमेरिकेत एमबीएचे शिक्षण घेतले आहे.

Indian Railway
आर्यनला जामीन मिळाला अन् मुकुल रोहतगी म्हणाले...

वैष्णव हे 1994 च्या तुकडीचे आयएएस अधिकारी होते. या परीक्षेत देशपातळीवरील गुणवत्ता यादीत त्यांचा 27 वा क्रमांक होता. त्यानंतर त्यांनी ओडिशातील बालासोर आणि कटक जिल्ह्यात जिल्हाधिकारी म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यालयात उपसचिव म्हणून काम केले. 2006 मध्ये ते मोरमुगाओ पोर्ट ट्रस्टचे उपाध्यक्ष झाले. त्यानंतर दोन वर्षे एमबीए पदवीसाठी अमेरिकेला गेले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com